KGF 2 चित्रपटाच्या यशासाठी रॉकीच देवाकडं साकडं

KGF 2 चित्रपटाच्या यशासाठी रॉकीच देवाकडं साकडं

KGF 2 चित्रपटाच्या यशासाठी रॉकीच देवाकडं साकडं

दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा चित्रपट ‘केजीएफ’चा (KGF) दुसऱ्या भागाची बऱ्याच काळापासून प्रेक्षक वाट पाहत आहेत. जस जशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे, तशी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत आहे. यादरम्यान चित्रपटातील सर्व कलाकार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. सध्या सिंहचलम मंदिरातील काही फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये रॉकी म्हणजेच यश देवाकडे प्रार्थना करताना दिसत आहे.

नुकताच सुपरस्टार यशने सिंहचलम मंदिरात गेला होता. तिथे त्याने आगामी ‘केजीएफ २’ चित्रपटाच्या यशासाठी देवापुढे प्रार्थना केली होती. यादरम्यानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये यश मल्टी शेड टीशर्ट आणि ब्लॅक डेनिम पँटमध्ये दिसत आहे. यासोबत त्याने एक गमछा कमरेला बांधला आहे.

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये यश भगवान गणेशाचा आशीर्वाद घेण्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध अनेगुड्डे श्री विनायक मंदिरात गेला होता. एवढेच नाही तर याआधी सफेद ट्रेडिशनल लिबास घालून धर्मस्थलमधील भगवान मंजूनाथचा आशीर्वाद घेताना दिसला होता.

दरम्यान काही दिवसांत ‘केजीएफ २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, त्यामुळे आता अॅडवांस बुकींग सुरू झाली आहे. यशने सर्वांना चित्रपट पाहण्यासाठी आवाहन केले आहे. या चित्रपटातील क्लायमेक्स खूप जबरदस्त असल्याचे म्हटले जात आहे. प्रशांत नील यांनी ‘केजीएफ २’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘केजीएफ चॅप्टर १’चेही प्रशांत नील यांनी दिग्दर्शन केले होते. केजीएफच्या दुसऱ्या भागात यश व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि रवीना टंडन, तसेच श्रीनिधी शेट्टी, प्रकाश राज प्रमुख भूमिकेत आहे. १४ फेब्रुवारीला ‘केजीएफ २’ तामिळ, तेलुगू, कन्नड, मळ्यालम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा – Lata Mangeshkar Award: लता मंगेशकर पुरस्कार जाहीर होताच पंतप्रधान मोदी म्हणाले, माझ्या आयुष्यातील हा शेवटचा पुरस्कार…


First Published on: April 12, 2022 1:09 PM
Exit mobile version