अमृताच्या आठवणीतली ‘स्मिता’!

अमृताच्या आठवणीतली ‘स्मिता’!

बॉलिवूडप्रमाणे मराठी रसिक प्रेक्षकांवर भुरळ घालणारी दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील. नुकतीच स्मिता पाटीलचा वाढदिवस नुकताच झाला. तीच्या वाढदिवसादिवशी मामि चित्रपट महोत्सवाचे उद्धाघन झाले. या उघ्दाटन कार्यक्रमाला अभिनेत्री अमृता सुभाषने हजेरी लावली होती. यावेळेच्या आठवणीची एक पोस्ट अमृताने सोशसमिडीयावर शेअर केली आहे. या कार्यक्रमादरम्यान अमृताने घातलेली ओढणी ही स्मिता पाटील यांची आहे. या ओढणीबद्दल अमृताने सोशलमिडीयावर एक गोष्ट शेअर केली आहे.

आज स्मिताताई पाटील यांचा वाढदिवस. याच दिवशी मामि महोत्सवाच उद्धाटन हा अपूर्व योग जुळून आला. तिच्या ताईनं ‘अस्तु’मधलं माझं काम बघून मला दिली. ‘या क्षेत्रात काम करणं तू थांबवशील तेव्हा तुझ्यानंतर ही ओढणी अशा मुलीला दे जी तुझ्या मते स्मिताची परंपरा पुढे नेत असेल’, असं त्यांनी सांगितलं होतं. ही भेट माझ्यासाठी अमुल्य आहे. आज तिच्या वाढदिवशी तिची आठवण म्हणून तिची ओढणी घेतली. तिच्यासारखंच मोठं कुंकू लावून, झुमके घालून या कार्यक्रमाला पोहोचले. कार्यक्रम सुरू झाल्यावर मोठ्या स्क्रीनवर स्मितादी आणि दीप्तीदींचा फोटो पडद्यावर झळकला आणि माझे डोळे भरून आले’.

अशी एक खास आठवण अमृताने सोशलमिडीयावर शेअर केली आहे. या अमृताने शेअर केलेल्या आठवणीला अनेकांनी कमेंट केल्या आहे. नुकतीच अमृता गली बॉय चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भुमिकेत झळकला होता.

First Published on: October 19, 2019 1:35 PM
Exit mobile version