गौरीची मिस्टी अखेर वाचली, गॅलरीच्या सज्जावरुन मांजरीला काढण्यात आपत्ती व्यवस्थापनला यश

गौरीची मिस्टी अखेर वाचली, गॅलरीच्या सज्जावरुन मांजरीला काढण्यात आपत्ती व्यवस्थापनला यश

गौरीची मिस्टी अखेर वाचली, गॅलरीच्या सज्जावरुन मांजरीला काढण्यात आपत्ती व्यवस्थापनला यश

आई कुठे काय करते (aai kuthe Kai karte) या लोकप्रिय मालिकेतील गौरी म्हणजेच अभिनेत्री गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni) सध्या चर्चेत आलीय ती म्हणजे तिच्या मांजरीमुळे. गौरी ही प्राणी प्रेमी असून तिच्याकडे मिस्टी (Misty)  नावाची एक मांजर (Cat) आहे. ही मांजर सोमवारी गौरीच्या घराच्या गॅलरीच्या सज्जावर जाऊन अडकली होती. त्या मांजरीला सुखरुप वाचवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या पथकाला यश आले आहे. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर मिस्टीला वाचवून नवे जीवनदान दिले आहे. गौरीची मांजर मिस्टी ही १८ महिन्यांची असून ती एक मादी मांजर आहे.

अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरातील लरीस टॉवरमध्ये पाचव्या मजल्यावर राहते. सोमवारी तिची अठरा महिन्यांची अचानक गॅलरीच्या सज्जावर गेली.  त्या मांजराला तेथून घरात येता येत नव्हते. तेथे अडकून पडल्याने ते मांजर जोरजोरात ओरडत होते. ही बाब गौरीच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने धाव घेतली. त्या मांजराला सुखरूप बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला दोरीचा वापर करण्यात आला. पण, काही केले तो मांजर हाती येत नव्हते. अखेर आपत्ती कक्षाच्या पथकाने त्या मांजराला गॅलरीच्या ग्रीलमधून हात टाकून त्याला पकडले. जवळपास तासभराने पथकाने त्या मांजराला सुखरूप बाहेर काढले. यावेळी कुलकर्णी कुटुंबांनी पथकाने आभार मानले. सुरुवातीला मांजरीला सुखरुप बाहेर काढणे येवढे लक्ष्य ठेवले होते. त्यामध्ये आम्हाला यश आल असल्याची माहिती आपत्ती कक्षाप्रमुख संतोष कदम यांनी दिली.


हेही वाचा – Nusrat-Yash Baby: बाळाच्या जन्मानंतर नुसरत आणि यश यांचा मोठा खुलासा; म्हणाले…

First Published on: October 11, 2021 5:43 PM
Exit mobile version