अभिनेत्री हिना खानला पितृशोक,हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचे झाले निधन

अभिनेत्री हिना खानला पितृशोक,हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचे झाले निधन

अभिनेत्री हिना खानला पितृशोक,हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचे झाले निधन

छोट्या पडदयापासून आपल्या अभिनयाची सुरुवात करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आपल्या परिवारासोबत अत्यंत जवळीक असल्यामुळे परिवरातील मुख्य सदस्याचे निधन झाल्यामुळे हिना खानवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. अनेकदा बिग बॉसच्या घरामध्ये असतांना हिना खान आपल्या वडिलांविषयी बोलताना दिसायची. तसेच वडिलांसोबत झालेले मजेशीर किस्से घरातील सदस्यांना सांगायची. हिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते ती नेहमी स्वत:चे तसेच वडिलांनसोबतचे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. व्हिडीओ मध्ये हिना आणि तिच्या वडिलांची खास बॉंडिंग चाहत्यांना दिसायची. सोशल मिडियावर अत्यंत सक्रिय असणार्‍या हिनाने गेल्या काही दिवसांपासून एकही पोस्ट शेअर केली नाही.

हिनाने आपल्या अभिनयाची सुरुवात ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेद्वारे केली होती. तसेच आत्तापर्यंत हिनाचा प्रवास पाहता अनेक रीयालिटी शोमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता. इतकेच नाही तर हिना खानने आंतराष्ट्रीय स्तरावरील कांन्स फेस्टिवल मधील रेड कारपेटवर झळकली आहे. हिना अभिनय क्षेत्रात करियर करत असल्यामुळे अनेक नातेवाईकांनी त्यांच्या परिवाराशी नातं तोडलं होतं.


हे हि वाचा – ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन

First Published on: April 20, 2021 8:22 PM
Exit mobile version