घरमनोरंजनज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन

Subscribe

किशोर नांदलस्कर यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमधून मालिकांमधून तसेच नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरल्या होत्या.

जेष्ठ विनोदीअभिनेते किशोर नांदलस्कर यांचं आज कोरोनाने दुःखद निधन झालं. कोरोना झाल्यामुळे त्यांना ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण कोरोनाविरोधातील त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. मंगळवारी रात्री १२.२० वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. किशोर नांदलस्कर यांच्या पश्चात पत्नी आणि तीन कुटूंबे असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वी किशोर नांदलस्कर यांना दम लागणे, छातीत धडधडणे असे शारीरिक त्रास सुरू झाले होते. वैद्यकीय तपासांनंतर त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

किशोर नांदलस्कर यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांमधून मालिकांमधून तसेच नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिका संस्मरणीय ठरल्या होत्या. विनोदी अभिनेते म्हणून त्यांची विशेष छाप होती. गुणी कलाकार म्हणून त्यांची चित्रपट क्षेत्रात ओळखले जात होते. किशोर नांदलस्कर यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून उल्लेखनीय कामगिरी निभावली आहे. व्यावसायिक रंगभूमीवर किशोर नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ इत्यादी नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. किशोर यांनी मराठी प्रमाणे हिंदी सिनेसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘वास्तव’ चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘जान जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटातील त्यांच्या विशेष गाजलेल्या कलाकृती आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गाने अनेक जणांचा बळी गेला आहे. सिनेसृष्टीतीतदेखील अनेक कलाकार या भयानक आजाराला मुकले आहेत. यातच आता ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.

- Advertisement -

हे वाचा-  http://नवाझुद्दीन सिद्दीकी गायनातही आजमावणार नशीब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -