kareena Kapoor Corona Positive: अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता आरोरा कोरोना पॉझिटिव्ह, करण जोहरच्या पार्टीला लावली होती हजेरी

kareena Kapoor Corona Positive: अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता आरोरा कोरोना पॉझिटिव्ह, करण जोहरच्या पार्टीला लावली होती हजेरी

kareena Kapoor Corona Positive: अभिनेत्री करिना कपूर आणि अमृता आरोरा कोरोना पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वी अटेंड केली होती पार्टी

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर हिला कोरोनाची लागण झाली आहे. करिनासोबत तिची फार जवळची मैत्रिण अमृता आरोरा देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले आहे. करिना दोन दिवसांपूर्वी निर्माता करण जोहरच्या पार्टीत सहभागी झाली होती. ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करणने ही पार्टी आयोजित केली होती. करिना आणि अमृता सोबतच बॉलिवूडचे जवळपास १५-२० कलाकार पार्टीला हजर होते. करिना कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रेटींची लग्न, लग्नाच्या रिसेप्शन पार्ट्या देखील सुरू आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडला कोरोनाचा विळखा बसण्याची शक्यता आहे.

करिनाचे कोरोना रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर करिनाचे घर पलिककेडून सील करण्यात आले आहे. करिना सध्या तिच्या राहत्या घरी आयसोलेशनमध्ये आहे. मुंबई पालिकने करिना कपूर आणि अमृता आरोराच्या संपर्कात आलेल्या लोकांची RTPCR चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत.

 

पालिकेकडून दोघींच्या संपर्कात आलेल्या लोकांचे ट्रेसिंग करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे करिनाने अटेंड केलेल्या पार्टीत किती लोक होते याचा देखील शोध घेण्यात येत आहे. करिना आणि अमृता या कोरोनाच्या सुपर प्रेडर असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. पालिकेकडून या दोन्ही अभिनेत्रींच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना चाचणी करण्यात सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे.

 

नुकतीच अभिनेत्री सारा अली खान, इब्राहिम अली खान आणि जान्हवी कपूर यांना एका कॉन्सर्टला हजेरी लावताना स्पॉट करण्यात आले. कॉन्सर्टनंतर तिघेही एका टॅक्सीने रवाना झाले. सोशल मीडियावर देखील तिघांच्या चर्चा रंगल्या आहेत. या कॉन्सर्टला बॉलिवूडची अनेक स्टार मंडळी उपस्थित होती. सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर देखील या कॉन्सर्टमध्ये सहभागी होती. संपूर्ण कॉन्सर्टमध्ये कोरोनाचे नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. तूफान गर्दीत एकाही सेलिब्रेटी तोंडावर मास्क घातला नव्हता. त्यामुळे ही कॉन्सर्ट चांगलीच चर्चेत आली आहे. बॉलिवूडमध्ये असे प्रकार सुरू राहिले तर बॉलिवूडकरांना येत्या काळात पार्ट्या चांगल्याच महागात पडणार आहेत.


हेही वाचा – Sam Bahadur: सॅम बहादूरमध्ये विक्कीसोबत दिसणार अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख

First Published on: December 13, 2021 5:03 PM
Exit mobile version