घरताज्या घडामोडीSam Bahadur: सॅम बहादूरमध्ये विक्कीसोबत दिसणार अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा...

Sam Bahadur: सॅम बहादूरमध्ये विक्कीसोबत दिसणार अभिनेत्री सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख

Subscribe

आरएसव्हीपी आणि मेघना गुलजारच्या आगामी ‘सॅम बहादूर’ चित्रपटात आणखी दोन कलाकारांची एन्ट्री झाली असून फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा ​​ यात आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी सज्ज आहेत. भारताच्या महान युद्ध नायकांपैकी एक असलेल्या सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आणि काळावर आधारित या चित्रपटातील कलाकारांबाबतची ही महत्त्वपूर्ण घोषणा दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली आहे.

मुख्य नायक सॅम माणेकशॉ यांची व्यक्तिरेखा विक्की कौशल साकारणार असून सान्या मल्होत्रा ​​त्यांची पत्नी सिल्लूची भूमिका साकारणार आहे ज्या माणेकशॉ यांच्या आधारस्तंभ आणि शक्ती आहे. फातिमा सना शेख देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisement -

माणेकशॉ यांची लष्करी कारकीर्द चार दशके आणि पाच युद्धांची होती. फील्ड मार्शल पदावर पदोन्नती मिळालेले ते पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात भारतीय लष्कराचा निर्णायक विजय लष्करप्रमुख म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. विशेष म्हणजे या वर्षी १९७१च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाली.

सॅम बहादूर चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक मेघना गुलजार म्हणतात, “माझ्याकडे साजरे करण्यासारखे खूप काही आहे… १९७१  च्या युद्धात आपल्या लष्कराला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाला ५० वर्षे पूर्ण झाल्याचा अभिमान आहे. सान्या मल्होत्रा ​​आणि फातिमा सना शेख ‘सॅम बहादूर’च्या टीममध्ये सामील होत आहेत, हे खूप रोमांचक आहे. चित्रपटातील या दोन्ही भूमिकांमध्ये खूप संवेदनशीलता, सन्मान आणि संयम आवश्यक आहे आणि या पात्रांना जिवंत करणाऱ्या महिलांसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे.

- Advertisement -

सान्या मल्होत्रा ​​म्हणते, “प्रत्येक महान पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि सॅम बहादूरचा तो आधार आणि ताकद सिल्लू माणेकशॉ होती. ही भूमिका साकारताना आणि या युद्धनायकाचा त्याच्या जीवनातील अविभाज्य भाग आणि प्रभाव समोर आणण्याचा मला सन्मान वाटतो. मी मेघना गुलजारची देखील खूप आभारी आहे आणि तिच्यासोबतच्या या रोमांचक प्रवासाची मी खरोखरच वाट पाहत आहे.

फातिमा सना शेख पुढे सांगते, “सॅम बहादूर कुटुंबात सामील होऊन आणि भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली आणि ख्यातनाम महिलांपैकी एक असलेली भूमिका बजावण्याचे आव्हान स्वीकारताना मला खूप आनंद होत आहे. या चित्रपटाद्वारे निर्माते ज्या स्मृती आणि वारशाचा सन्मान करू इच्छितात त्या मागची उत्कटता मला सर्वात जास्त उत्साही वाटते.”


हेही वाचा – India’s Miss Universe 2021 : ‘या’ प्रश्नाचे उत्तर देऊन हरनाज संधूने जिंकला ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा किताब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -