‘गर्ल्स’ चित्रपटातील ‘या’ हॉट अभिनेत्रीचा पोस्टर प्रदर्शित

‘गर्ल्स’ चित्रपटातील ‘या’ हॉट अभिनेत्रीचा पोस्टर प्रदर्शित

सध्या पोस्टरवरून ‘गर्ल्स’ चित्रपट चर्चेत आलेला आहे. काही दिवसांपूर्वी ‘गर्ल्स’ चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला होता. ‘मुलींची लहर, केला कहर’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या पोस्टरमध्ये पाठमोऱ्या उभ्या असलेल्या ‘या’ तीन मुली कोण? याकडे सगळ्यांच्याच लक्ष लागलं होतं. आता या पोस्टर मधल्या मुलीची वेगवेगळ्या पोस्टर आणि टॅगलाईनसह ओळख समोर येत आहे. ‘गर्ल्स’ चित्रपटातील ‘मती’ म्हणजेच अभिनेत्री अंकिता लांडेचा पोस्टर गुरुवारी प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र याच पोस्टरचा संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी तीव्र निषेध केला होता. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. तरी देखील आज या चित्रपटाचे तिसरे पोस्टर प्रदर्शित झालं आहे. या पोस्टरमध्ये ‘मॅगी’ अर्थातच केतकी नारायण ही सुद्धा प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाली आहे. केतकी ‘मॅगी’ची भूमिका साकारणार आहे.

नक्की वाचासौमित्रच्या आईचं सचिन पिळगावकरांशी आहे खास कनेक्शन!

खरं तर ‘मॅगी’ दिग्दर्शकांना सहज सापडली नाही. त्यासाठी त्यांना खूपच मेहनत घ्यावी लागली आणि अथक प्रयत्नानंतर त्यांना केतकीच्या रूपात ‘मॅगी’ सापडली. या शोधाबाबत दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांनी असं सांगितालं की, “आम्ही ‘मॅगी’ला शोधण्यासाठी जंग जंग पछाडले. तेव्हा कुठे आम्हाला अपेक्षित अशा ‘मॅगी’चा शोध लागला. ज्यावेळी आम्ही ‘ही’ व्यक्तिरेखा ठरवली त्यावेळी तिचे चित्र आमच्या डोक्यात पक्के होते आणि तशी मुलगी आम्हाला कुठेच सापडत नव्हती. अगदी सोशल मीडियावरही आम्ही तिचा शोध घेतला. अनेक मुली ऑडिशन्ससाठी येऊन गेल्या, तरीही मनासारखी ‘मॅगी’ मिळतच नव्हती. ही शोधमोहीम सुरू असतानाच कुठून तरी केतकीचा फोटो समोर आला. या भूमिकेसाठी केतकीने ऑडिशन दिली आणि आम्हाला आमची ‘मॅगी’ सापडली. केतकीची या भूमिकेसाठी निवड झाल्यानंतर काही काळ तिने एक वर्कशॉप केले. तिची आकलन क्षमता अफाट आहे. खरं तर ‘बोल्ड’ भूमिका दिसायला जितकी सोपी दिसते तितकी ती साकारणे कठीण असते आणि हे आव्हान केतकीने लीलया पेललं. ती ‘मॅगी’शी अगदी समरस झाली.”

हेही वाचा‘गर्ल्स’ चित्रपटाच्या पोस्टरवर सलील कुलकर्णी यांचा तीव्र निषेध

प्रमुख भूमिका असलेला केतकीचा ‘गर्ल्स’ पहिला मराठी चित्रपट असला तरी या आधी केतकीने ‘युथ’ या मराठी चित्रपटात भूमिका साकारली आहे. या व्यतिरिक्त तिने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये, शॉर्ट फिल्म्स मध्येही विविध भूमिका केल्या आहेत.

‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ आणि ‘कायरा कुमार क्रिएशन्स’ प्रस्तुत ‘गर्ल्स’ हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत असून ‘अ कायरा कुमार क्रिएशन प्रॉडक्शन’च्या अंतर्गत ‘गर्ल्स’ या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. या चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.


हेही वाचा श्वेता बच्चनने लाडक्या बाबांना दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!


 

First Published on: October 11, 2019 4:47 PM
Exit mobile version