Gond Ke Laddu: ‘गोंद के लड्डू’ साध्या मानवी भावनांची कथा आहे – नीना कुळकर्णी

Gond Ke Laddu: ‘गोंद के लड्डू’ साध्या मानवी भावनांची कथा आहे – नीना कुळकर्णी

Gond Ke Laddu: 'गोंद के लड्डू' साध्या मानवी भावनांची कथा आहे - नीना कुळकर्णी

अमेझॉन प्राईम (Amazon Prime)  व्हिडिओच्या बहुप्रतिक्षित हिंदी एंथोलॉजी ‘अनपॉझ्ड: नया सफर’ (Unposed: Naya Safar) च्या अलीकडेच लाँच झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या अमेझॉन ओरिजिनल्समध्ये पाच हिंदी लघुपट दाखवले जाणार असून, प्रत्येक लघुपट महामारीमुळे आलेल्या आव्हानांमध्ये आपल्याला गुंतवून ठेवतो, मात्र सकारात्मक दृष्टीकोन स्वीकारण्याच्या गरजेवरही भर देतो. पाच प्रतिभावान दिग्दर्शक तुमच्यासाठी अशा कथा घेऊन आले आहेत ज्या तुम्हाला थक्क करून सोडतील.

‘गोंद के लड्डू’ ( Gond Ke Laddu)  या लघुपटात असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी म्हणातात की, “प्रत्येकजण एक छोटीशी आशा शोधत आहे आणि ‘अनपॉझ्ड: नया सफर’चे तेच उद्दिष्ट्य आहे. एंथोलॉजीचे पाचही चित्रपट तुमच्या चेहऱ्यावर हसू आणतील. ‘गोंद के लड्डू’ या आमच्या चित्रपटाचे शीर्षक असून यामध्ये एक ज्येष्ठ नागरिक या अनिश्चित काळात नवीन तंत्रज्ञानाशी कसे जुळवून घेते, याची ही कथा आहे. ही अगदी साध्या मानवी भावभावनांची कथा आहे, जी आमची दिग्दर्शिका शिखा माकन हिने अतिशय सुंदरपणे मांडली आहे. ही एक अशी कथा आहे जी प्रत्येकजण स्वतःशी रिलेट करेल. अमेझॉन प्राईम व्हिडीओशी जोडून घेताना मला आनंद होत आहे ज्यामुळे प्रेक्षक त्यांच्या घरातील आरामात आणि सुरक्षित राहून हा चित्रपट पाहू शकतील.”

‘अनपॉज्ड: नया सफर’ अशा पाच अनोख्या कथा आपल्यासाठी घेऊन येत आहे ज्या, आशा, सकारात्मकता आणि नवीन सुरुवात याबाबत आहेत. प्रेम, तळमळ, भीती आणि मैत्री यासारख्या कच्च्या मानवी भाव-भावनांचे शब्दचित्र – शिखा माकन (गोंद के लड्डू), रुचिर अरुण (तीन तिगडा), नुपूर अस्थाना (द कपल), अयप्पा केएम (वॉर रूम) आणि नागराज मंजुळे (वैकुंठ) यांसारख्या चित्रपट दिग्दर्शकांनी संवेदनशीलतेने जिवंत केले आहे. भारत आणि 240 देश आणि प्रदेशांमधील सदस्य ‘अनपॉज्ड: नया सफर’ 21 जानेवारी 2022 पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहू शकतील.

First Published on: January 18, 2022 2:38 PM
Exit mobile version