‘द काश्मीर फाईल्स’ मधील अभिनेत्री पल्लवी जोशीचा शूटिंगदरम्यान अपघात

‘द काश्मीर फाईल्स’ मधील अभिनेत्री पल्लवी जोशीचा शूटिंगदरम्यान अपघात

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आणि ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटातील अभिनेत्री पल्लवी जोशीला एका चित्रपटाच्या सेटवर गंभीर दुखापत झाली आहे. ती विवेक अग्निहोत्री यांच्यासोबत ‘द वॅक्सीन वॉर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती याचं वेळी या प्रकार घडला. या चित्रपटाचे शूटिंग हैदराबादमध्ये सुरु असून यात पल्लवी महत्त्वाची भूमिका साकारत आहे. सोमवारी या चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना पल्लवीचा दुखापत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, त्यावेळी शूटिंगदरम्यान एका वाहनाने अचानक पल्लवीला धडक मारली.

दरम्यान, दुखापती झाल्यानंतरही पल्लवीने तिचा उरलेला शॉट पूर्ण केला त्यानंतर ती उपचारासाठी गेली. सध्या पल्लवीवर हैदराबादमधील एका स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती ठीक आहे.

पल्लवीला ‘द काश्मिर फाईल्स’ या चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली. आगामी काळात ती विवेक अग्निहोत्रींच्या ‘द वॅक्सीन वॉर या चित्रपटामध्ये झळकणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होईल. हा भारतात हिंदी, इंग्रजी, तेलुगु, तमिळ मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा एकूण 10 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

 


हेही वाचा :

कपूर कुटुंबातील जहान’ची बॉलीवूडमध्ये दमदार एन्ट्री, ट्रेलर रिलीज

First Published on: January 17, 2023 9:12 AM
Exit mobile version