अभिनेत्री पायल घोषवर ॲसिड हल्ल्याचा प्रयत्न

अभिनेत्री पायल घोषवर ॲसिड हल्ल्याचा प्रयत्न

अभिनेत्री पायल घोषवर जीवघेणा हल्ला, हल्लेखोरांकडून अॅसिड फेकण्याचा प्रयत्न

बॉलिवूड अभिनेत्री पायल घोषवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Mumbai News) अंधेरी भागात काही अज्ञात हल्लेखोरांनी अॅसिडची भीती दाखवून पायलवर (Payal Ghosh attacked) हल्ला केला आहे. रविवारी रात्री १० च्या सुमारास मेडिकल शॉपमधून काही औषधं घेऊन कारमध्ये बसून घरी जात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. तसेच तिच्या जवळील सामान हिसकावण्याचा प्रयत्न केला आहे. हल्लेखोरांनी चेहरा पूर्ण झाकला असल्याने पायलला त्यांना पाहता आले नाही. या हल्ल्यात तिला काही किरकोळ जखमा झाल्या आहेत.

पायल घोष हिने दिलेल्या माहितीनुसार, ती मुंबईतील अंधेरी भागातून घरी परतत होती. एवढ्यात ती कारमध्ये बसत असतानाच अचानक काही अज्ञातांनी तिच्यावर हल्ला केला. या हल्लेखोरांच्या हातात अॅसिड असा दावा तिने केला आहे. या हल्लेखोरांनी तिच्याकडील सामान हिसकवण्याचा प्रयत्न केला. तिने मदतीसाठी आरडाओरडा केला मात्र ते हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या हल्लेखोरांनी तिच्या डोक्यावर मारले मात्र सुदैवाने तिच्या डोक्याला कोणतीही इजा झाली नाही. त्यांनी तिच्या हातावर हल्ला केला त्यामुळे हाताला किरकोळ जखम झाली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. त्यामुळे ती हल्लेखोरांना पाहू शकली नाही. याप्रकरणी ती आणि तिचा भाऊ एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती पायलने दिली आहे.

तसेच या घटनेमुळे तिच्यावर कोणतरी पळत ठेवून असल्याचा दावा पायलने केला आहे. ती दहा वर्षांपासून मुंबईत राहतेय, अनेकदा पहाटे चार किंवा रात्री अपरात्री काही कामानिमित्त बाहेर जाते मात्र तेव्हा अशाप्रकारचा अनुभव तिला आला नाही. मात्र या घटनेमुळे तिला असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.


 

First Published on: September 21, 2021 8:07 AM
Exit mobile version