हावडामध्ये लूटमारीदरम्यान अभिनेत्रीची गोळी मारून हत्या

हावडामध्ये लूटमारीदरम्यान अभिनेत्रीची गोळी मारून हत्या

पश्चिम बंगालच्या हावडामध्ये बुधवारी झारखंडमधील एका अभिनेत्रीसोबत लूटमारीचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी अभिनेत्रीकडून लूटमारीचा विरोध करताच चोरट्यांनी अभिनेत्रीची हत्या केली आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अभिनेत्रीचं नाव रिया कुमारी असून ती तिचा पती चित्रपट निर्माता प्रकास कुमार आणि दोन वर्षांच्या मुलीसोबत राष्ट्रीय राजमार्ग 16 वरुन कोलकत्त्याला जात होती. त्याच वेळी ही धक्कादायक घटना घडली लूटमारीदरम्यान चोरट्यांनी अभिनेत्रीला गोळी मारली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी जवळपास 6 वाजता रिया कुमारी आपल्या कुटुंबासोबत बाग्नान ठाणा येथे महिष रेखाजवळ थांबली होती. त्यावेळी तीन भामट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचे सामान चोरी करण्याचा प्रयत्न केला. या सर्व झटापटीमध्ये चोरट्यांनी रिया कुमारीला गोळी मारली आणि लगेच फरार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी तिचा पती तिला कारमध्ये बसवून जवळपास तीन किमी मदतीसाठी फिरु लागला. त्यानंतर एका ठिकाणी त्यांना काही लोकांना पाहिलं आणि त्यांना ही घटना सांगितली. स्थानीक लोकांनी त्यांना रुग्णालयात नेले परंतु तिथे गेल्यावर डॉक्टरांनी रियाला मृत घोषित केले.

 


हेही वाचा :

तुनिषानंतर 22 वर्षीय इंस्टाग्राम इन्फ्लुएंजर तरुणीची आत्महत्या

First Published on: December 28, 2022 3:52 PM
Exit mobile version