घरमनोरंजनतुनिषानंतर 22 वर्षीय इंस्टाग्राम इन्फ्लुएंजर तरुणीची आत्महत्या

तुनिषानंतर 22 वर्षीय इंस्टाग्राम इन्फ्लुएंजर तरुणीची आत्महत्या

Subscribe

नुकत्याच काही दिवसांपूर्वी 20 वर्षीय अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली. या धक्कादायक प्रकरणाची सगळीकडे चर्चा सुरु असताना याचं दरम्यान आणखी एका 22 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. छत्तीसगढ येथील लीना नागवंशी असं या तरुणीच नाव आहे. लीना इंस्टाग्रामवरीलर प्रसिद्ध इन्फ्लुएंजर होती. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असायची. शिवाय विविध फोटो आणि रिल्स देखील शेअर करायची.

छत्तीसगढ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास रात्री 1 वाजता त्यांना ही सूचना मिळाली की लीना नागवंशीने नावाच्या 22 वर्षीय तरुणीने फास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचायच्या आधी तिच्या घरच्यांनी तिचा मृतदेह खाली काढला. आता तिच्या मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, लीना नागवंशीने कोणतेही पत्र लिहिलेले पोलिसांना सापडले नाही. तसेच तिचे कोणासोबत वाद नसल्याचं तिच्या घरच्यांनी सांगितलं. मृत्यूच्या 2-3 दिवस आधी लीनाने इंस्टाग्रामवर रिल्स देखील शेअर केले होते. ज्यात ती खूप आनंदी दिसत होती.

लिना इंस्टाग्राम व्यतिरिक्त यूट्यबवर देखील सक्रिय असायची. छत्तीसगडमध्ये राहणारी लीना नागवंशी बीकॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिचे 10 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. लीनाच्या अकाली मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

ही आत्महत्या आहे की लव्ह जिहाद?… तुनिषाच्या काकांनी विचारला प्रश्न

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -