राखीसोबतच्या लग्नाला आदिलने दिली कबुली

राखीसोबतच्या लग्नाला आदिलने दिली कबुली

ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. 7 महिन्यांपूर्वी राखीने आदिलसोबत लग्न केलं परंतु या लग्नाचा खुलासा तिने नुकताच केला आहे. मात्र, या लग्नाला आदिल नकार देत होता. दरम्यान, नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आदिलने राखीसोबत लग्न झालं असल्याची कबूली दिली आहे. परंतु आदिलच्या घरच्यांनी अजूनही राखीला सून म्हणून स्वीकारलं नाही त्यामुळे तो सध्या त्याच्या घराच्यांना राखीसोबतच्या नात्यावर मनवण्याचा प्रयत्न करत आहे.

आदिलने दिली लग्नाची कबूली
राखी सावंत आणि आदिलच्या लग्नाच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आदिलने राखीसोबत केलेल्या लग्नाची कबूली दिली आहे. एका मुलाखतीत तो म्हणाला की, मी आणि राखी विवाहीत आहोत. आम्ही दोघेही एकत्र आहोत आणि आनंदी देखील आहोत. खरंतर, आदिलच्या घरचे जोपर्यंत राखीला स्विकारत नाही तोपर्यंत त्याला त्यांचं लग्न खासगी ठेवायचे होते. परंतु राखीने त्याला सांगितंल की, आता खूप झालं. लोकांना खरं सांगायची वेळ आता आली आहे. तेव्हा आदिल लग्नाच्या चर्चेला कबूली दिली.

 


हेही वाचा :

दुबईतील बुर्ज खलिफावर दाखवला जाणार ‘पठाण’चा ट्रेलर

First Published on: January 14, 2023 2:58 PM
Exit mobile version