प्रचंड टीका झाल्यानंतर अखेर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचं नाव बदललं

प्रचंड टीका झाल्यानंतर अखेर ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचं नाव बदललं

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी अभिनित ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट नावावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेकांनी या नावावर आक्षेप नोंदविला होता. तसेच चित्रपटाचे पहिले गाणे युट्यूबवर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला डिसलाईक करण्याची मोहिम चालविण्यात आली होती. हिंदू सेनेने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून नावाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अखेर बायकॉट होण्यापासून वाचण्यासाठी या बहुचर्चित चित्रपटाचे नाव बदलण्यात आले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे. आता या चित्रपटाचे नाव फक्त ‘लक्ष्मी’ असे असेल.

लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाच्या नावामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याची तक्रार अनेकांनी केली होती. हिंदू सेनेने रितसर पाठवून या चित्रपटाचे नाव बदलण्याची विनंती केली होती. तर नेटीझन्सनी या चित्रपटाला बायकॉट करण्यासाठी मोहीम चालविण्याचा इशारा दिला होता. हल्लीच नेपोटिझमच्या मुद्द्यावरुन ‘सडक २’ या चित्रपटाला सर्वाधिक डिसलाईक मिळवण्याचा विक्रम नोंदविला गेला होता. त्यामुळे बायकॉटपासून वाचण्यासाठी निर्मात्यांनी वेळीच चित्रपटाच्या नावात बदल करण्याचा निर्णय घेतला.

महाभारतात भीष्म पीतामह यांचा रोल करणारे आणि छोट्या पडद्यावर शक्तीमान म्हणून प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनी देखील दोन दिवसांपूर्वी लक्ष्मी बॉम्ब या नावाला विरोध केला होता. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी भलीमोठी पोस्ट टाकून या नावाचा समाचार घेतला होता. तुम्ही अल्लाह बॉम्ब किंवा बदमाश जीजस असे नाव एखाद्या चित्रपटाला देऊ शकता का? मग हिंदूंच्या नावांचीच का थट्टा उडवली जाते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. तसेच जनत जनार्दन यांनीच आता अशा चित्रपटांना धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी केले होते.

‘अल्लाह बॉम्ब’ किंवा ‘बदमाश जीजस’ असे चित्रपटाचे नाव ठेवू शकता? मग लक्ष्मी बॉम्ब का?

 

First Published on: October 29, 2020 5:12 PM
Exit mobile version