Lal Singh Chaddha: करिना कपूरनंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरचा लूक व्हायरल

Lal Singh Chaddha: करिना कपूरनंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरचा लूक व्हायरल

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि अभिनेत्री करिना कपूर असे स्टारर चित्रपट ‘लाल सिंग चढ्ढा’ची शुटिंग सध्या चंदिगडमध्ये सुरू आहे. थ्री इडियट आणि तलाश चित्रपटानंतर करिना कपूर पुन्हा एकदा आमिर खानसोबत ‘लाल सिंग चढ्ढा’मध्ये स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. याच चित्रपटातील करिनाचा लूक लीक झाल्यानंतर आता आमिरचा लूक लीक झाला आहे.

असा आहे आमिरचा भन्नाट लूक

सध्या आमिरच्या नव्या लूकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटामध्ये आमिरने एका शीख व्यक्तीची भूमिका साकारली असून त्याचा लूकदेखील त्याचप्रमाणे आहे. व्हायपल होत असलेल्या फोटोमध्ये आमिरने हलक्या गुलाबी रंगाची पगडी, स्पोर्ट्स शूज, चौकटींचे शर्ट, दाढी अशा लूकमध्ये बघायला मिळणार आहे.

 

‘लाल सिंग चढ्ढा’मध्ये करिनाचा साधा लूक

या चित्रपटात करिना कपूरच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर करिना अर्थात बेबोचा लूक खूपच साध्या मुलीसारखा आहे. या पहिल्या लूक करिनाने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाच्या सलवारमध्ये दिसतेय. २०१६ साली आलेल्या उडता पंजाब या चित्रपटात जसा लूक होता तशाप्रकारच्या लूकमध्ये करिना या चित्रपटात दिसणार आहे.


आमिर खानने शेअर केला त्याच्या आगामी चित्रपटाचा व्हिडिओ

First Published on: November 11, 2019 7:18 PM
Exit mobile version