घरमनोरंजनआमिर खानने शेअर केला त्याच्या आगामी चित्रपटाचा व्हिडिओ

आमिर खानने शेअर केला त्याच्या आगामी चित्रपटाचा व्हिडिओ

Subscribe

या चित्रपटात करीना कपूर खान मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार

आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. आमिर खान जेव्हा एखादा चित्रपट करतो तेव्हा तो पूर्णपणे जोमाने तसेत मनापासून करतो. असाच एक आगामी चित्रपट आमिर खानचा येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chaddha)’असून या चित्रपटाची शुटिंग सुरू झाली आहे. नुकताच मिस्टर परफेक्शनिस्टने त्याच्या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर चाहत्यांसह शेअर केले आहे.

- Advertisement -

‘लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chaddha)’च्या या मोशन पोस्टरमधून काही कवितेच्या ओळी ऐकायला मिळतात. हे पोस्टर ट्विटरवरून शेअर करताना आमिर खानने ‘क्या पता हम में कहानी या कहानी में हम…’ बता दें असे कॅप्शन दिले आहे. या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख देखील सांगितली आहे. त्याप्रमाणे हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A little light. A lot of magic. @vivo_india

A post shared by Aamir Khan (@_aamirkhan) on

- Advertisement -

टॉम हँक्सचा ‘फॉरेस्ट गंप (१९९४)’ चा ऑफिशिअल रिमेक ‘लाल सिंह चड्ढा (Lal Singh Chaddha)’ या चित्रपटाला अतुल कुलकर्णीने लिहिले आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती व्हायकॉम १८ स्टुडिओ आणि आमिर खान प्रोडक्शन्स करत आहेत. पुढच्या वर्षी २०२० च्या ख्रिसमसच्या निमित्ताने हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटात करीना कपूर खान मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -