‘देऊळ बंद २ ..आता परिक्षा देवाची’, तरडेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा!

‘देऊळ बंद २ ..आता परिक्षा देवाची’, तरडेंनी केली नव्या चित्रपटाची घोषणा!

देऊळ बंद २

अभिनेता व दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रविण तरडे २०१५ साली आलेला ‘देऊळ बंद’ हा चित्रपट प्रचंड गाजला. हा चित्रपट अक्कलकोटचे ‘श्री स्वामी समर्थ’ महाराज यांच्या भक्तीवर आधारित होता. विशेष म्हणजे पाच वर्षानंतर प्रविण तरडे यांनी ‘देऊळ बंद’च्या सिक्वलची घोषणा केली आहे. लवकरच ‘देऊळ बंद २ ..आता परिक्षा देवाची’, हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गुरुपौर्णिमा असल्याच्या निमित्ताने या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रवीण तरडे करत असून निर्मिती जयश्री कैलास वाणी आणि जुईली वाणी-सूर्यवंशी करणार आहेत. प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर प्रेक्षकांची या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट पुढच्या गुरुपौर्णिमेला म्हणजेच २३ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र अद्यापतरी या चित्रपटातील कलाकारांची नावं मात्र गुलदस्त्यातच आहेत.

“आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ‘देऊळ बंद 2.. आता परीक्षा देवाची’ या नव्या चित्रपटाला सुरुवात करतोय आणि पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल”, असं चित्रपटाच्या निर्मात्या जुईली वाणी- परदेशी यांनी सांगितलं.तसंच ‘गेल्यावेळी स्वामींना शास्त्रज्ञ भेटले होते…यावेळी स्वामींना शेतकरी भेटणार आहे. हा सिनेमाही हिट होईल,’ असा विश्वास चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

न, यापूर्वी ‘देऊळ बंद’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. या चित्रपटात गश्मीर महाजनी आणि मोहन जोशी मुख्य भूमिकेत झळकले होते. त्यामुळे या नव्या चित्रपटाचीही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.


हे ही वाचा – मालिकेच्या सेटवर अभिनेत्रीला कोरोनाची लागण, क्रू मेंबर्सचीही होणार चाचणी!


 

First Published on: July 6, 2020 4:22 PM
Exit mobile version