केंद्र सरकारने PUBG सह ११८ चीनी Apps वर बंदी घातली आहे. यामुळे PUBG च्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, या PUBG बॅन झाला म्हणून नाराज झालेल्यांना बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मल्टीप्लेअर अॅक्शन गेम FAU-G लाँच करणार आहे. यामधून २० टक्के महसूल ‘भारत के वीर’ ट्रस्टला देणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत नवीन मल्टीप्लेअर मिड-कोअर गेम लाँच केला जाणार आहे. गेमचं नाव ‘फियरलेस एंड युनाइटेड: गार्ड्स (FAU: G)’ असेल.
A post shared by Akshay Kumar (@akshaykumar) on
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेचं समर्थन करत नविन अॅक्शन गेम, फियरलेस एंड युनाइटेड: गार्ड्स FAU: G, करमणूक व्यतिरिक्त खेळाडूंना आमच्या सैनिकांच्या बलिदानाबद्दलही माहिती मिळेल. एकूण उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम @BharatKeVeer ट्रस्टला देण्यात येणार आहे,” असं अक्षय कुमारने म्हटलं आहे.