Video : आराध्याचे हिंदी ऐकूण नेटकरी हैराण

Video : आराध्याचे हिंदी ऐकूण नेटकरी हैराण

Video : आराध्याचे हिंदी ऐकूण नेटकरी हैराण

अभिनेत्री ऐश्वर्या राय जगभरात प्रसिद्ध आहे. ऐश्वर्या सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब आहे. परंतु ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी अँक्टिव्ह असते.   ऐश्वर्या प्रमाणे आता लेक आराध्या बच्चन देखील प्रसिद्धी झोतात आहेत. आराध्याला ऐश्वर्या आणि अभिषेकसोबत अनेकवेळा वेगवेगळ्या कार्यक्रमात स्पॉट करण्यात येते. आराध्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऐश्वर्याच्या फॅन पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.  आराध्या या व्हिडीओत शुद्ध हिंदीत बोलत आहे. आराध्याचं हिंदी पाहून सर्वांचजण हैराण होत सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडीओनंतर आराध्यावर प्रेमाचा वर्षात करत तिचे कौतुक सुरू आहे. तिच्यावरच्या संस्कारांचे  सर्व कौतुक करत आहे.

व्हिडीओमध्ये आराध्या बच्चन हिंदीत संवाद साधत आहे. हिंदीत बोलताना आराध्यामध्ये वेगळाच आत्मविश्वास दिसत आहे. आराध्याचे संगोपन एखाद्या स्टार किड्सपेक्षा खूपच वेगळे झाले आहे हे यातून लक्षात येत आहे. आराध्या बच्चनच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलेय, हे टॅलेंट तिला तिच्या आई वडिलांकडून मिळाले आहे. हे तिच्या रक्तातच आहे. हिंदीवरील तिची पकड तिला तिच्या आजी आजोबांकडून मिळाली आहे. आराध्या मोठी होऊन एक वंडरफूल व्यक्ती बनेल यात काहीच शंका नाही.

आराध्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ अभिषेक आणि ऐश्वर्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. आराध्या एखाद्या स्टार किड्सपेक्षा नेहमीच वेगळीच दिसून येते. काही दिवसांपूर्वी आराध्याने अनिल आणि टीना अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानीच्या लग्नात दिसली होती. संपूर्ण बच्चन परिवारासोबत आराध्याने लग्न एन्जॉय केले होते. लग्नात आराध्याने आई वडिलांना मॅचिंग रेड कलरच्या आउटफिटमध्ये दिसली होती.


हेही वाचा –  The Kashmir Files वरून काँग्रेसने ट्विट करत BJPवर साधला निशाणा

First Published on: March 14, 2022 3:21 PM
Exit mobile version