घरताज्या घडामोडीThe Kashmir Files वरून काँग्रेसने ट्विट करत BJPवर साधला निशाणा

The Kashmir Files वरून काँग्रेसने ट्विट करत BJPवर साधला निशाणा

Subscribe

अनेक राज्यांनी हा सिनेमा टॅक्स फ्री केला आहे. परंतु सिनेमा रिलीज झाल्यानंतर केरळमध्ये काँग्रेसने काश्मीरी पंडितांनी जम्मू काश्मीरमधून पलायन केल्याच्या मुद्द्यांवरुन ट्विट करत भाजपवर निशाणा साधलाय. 

द काश्मीर फाईल्स हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाची सध्या बॉलिवूडमध्ये एकच चर्चा रंगली आहे. ९० च्या दशकात काश्मीरी पंडितांचा संघर्ष आणि अडचणींवर हा सिनेमा भाष्य करतो. अनेक राज्यांनी हा सिनेमा टॅक्स फ्री केला आहे. परंतु सिनेमा रिलीज झाल्यानंतर केरळमध्ये काँग्रेसने काश्मीरी पंडितांनी जम्मू काश्मीरमधून पलायन केल्याच्या मुद्द्यांवरुन ट्विट करत भाजपवर निशाणा साधलाय.  केवळमध्ये काँग्रेसने काश्मीर पंडितांच्या मुद्द्यांवरुन काही फॅक्ट समोर आणलेत. ज्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे.

काँग्रेसने दावा केलाय की, यूपीए सरकारने जम्मूमध्ये काश्मीरी पंडितांसाठी 5 हजार 242 घरे बांधली. त्याचप्रमाणे पंडितांच्या प्रत्येक परिवाराला ५ लाखांची आर्थिक मदत केली. तसेच पंडितांच्या परिवारातील विद्यार्थ्यांना 1,168 करोडची स्कॉलरशिप आणि शेतकऱ्यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या. त्यावेळी काश्मीर पंडितांनी मोठ्या प्रमाणात खोरे सोडले.

- Advertisement -

काँग्रेसने पुढे म्हटले, त्यावेळी जम्मूमध्ये आरएसएसचे जगमोहन हे राज्यपाल होते. भाजप समर्थित व्हिपी सिंह सरकारच्या काळात काश्मीर पंडितांचे पलायन सुरू झाले. काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेय, डिसेंबर १९८९मध्ये भाजप समर्थित व्हिपी सिंह यांचे सरकार आले आणि पुढच्या महिन्यात जानेवारी १९९० मध्ये काश्मीरी पंडितांचे पलायन सुरू झाले. भाजपने काश्मीरी पंडितांसाठी काहीही केले नाही.

- Advertisement -

काँग्रेस पक्ष युनिटने दावा केला आहे की, राज्यपाल जगमोहन यांनी काश्मीर पंडितांना सुरक्षा देण्याचे सोडून त्यांना जम्मूमध्ये शरण येण्यास सांगितले. काश्मीरी पंडितांच्या पलायनाच्या वेळी भाजप अयोद्धेत राम मंदिराच्या मुद्द्यावर हिंदू मुस्लिम विभाजनाची योजना आखत होते.

केरळ काँग्रेसने केलेल्या ट्विटनंतर भाजप खासदार केजे अल्फोंस यांनी म्हटलेय, काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगींनी अशी परिस्थिती निर्माण केली होती ज्यामुळे काश्मीरी पंडित तिथे राहू शकत नव्हते. त्यांची हत्या करण्यात येत होती. त्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण झाली होती. त्यामुळेच ते तिथून पलायन करत होते. कलम ३७० लागू झाल्यानंतर गोष्टींमध्ये नाट्यमय रुपाने सुधार झाला. जवळपास 1.5 लाखांहून अधिक काश्मीरी पंडितांना जातीय मुद्द्याच्या आधारवर सत्तेतून बाहेर काढण्यात आले होते.

देशातील जवळपास 700 स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या द कश्मीर फाईल्स या सिनेमाचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले आहे. 11 मार्च रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने दोन दिवसांत सुमारे साडेअकरा कोटींची कमाई केली आहे.


हेही वाचा – The Kashmir Files यशावरी बॉलिवूडच्या मौन पाहू कंगनाचा संताप, म्हणाली ‘यश पाहून सगळे गप्प’

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -