बिग बींना मागे टाकत ‘हा’ अभिनेता सोशल मीडियावर हीट!

बिग बींना मागे टाकत ‘हा’ अभिनेता सोशल मीडियावर हीट!

अभिनेता अजय देवगनची १०० वी कलाकृती असलेल्या तान्हाजी चित्रपटाने कमाल केली आहे. २०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचलेल्या ह्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली मोहोर उमटवतच असताना स्कोर ट्रेंड इंडियाच्या लोकप्रियतेच्या चार्टवरही अजय देवगन नंबर वन स्थानी विराजमान झालेला आहे. जानेवारी महिन्यात तान्हाजी चित्रपटामूळे अजय देवनगच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झालेली दिसून येतेय. तान्हाजी चित्रपटाच्या प्रमोशनच्यामूळे वर्षाच्या सुरूवातीच्या महिन्यात अजयने लोकप्रियतेत चौथे स्थान मिळवले होते. पण चित्रपट सिनेमागृहांमध्ये झळकताच अजय देवगनच्या लोकप्रियतेत वाढ झाली आणि अजय पहिल्या स्थानी पोहोचला.

तान्हाजीच्या रिलीजवेळीच सुपरस्टार रजनीकांतचा दरबार चित्रपटही झळकला. ह्या सिनेमाच्या लोकप्रियतेमूळे रजनीकांतच्याही लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून येतेय. साउथ सुपरस्टार रजनीकांत आपल्या सिनेमाच्या रिलीजवेळी सातव्या स्थावार होते. तर चित्रपट रिलीज झाल्यावर ते सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचले.

सुपरस्टार रजनीकांत ह्यांना लोकप्रियतेत बॉलीवूडच्या तीन महारथींनी चांगलीच टक्कर दिली आहे. सलमान खान, अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ह्या बॉलीवूडच्या तीन सुपरस्टार्सनी लोकप्रियतेत रजनीकांत ह्यांना मागे टाकले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.
ह्या आकडेवारीनूसार, डिजिटल न्यूज (सोशल प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट), व्हायरल न्यूज आणि न्यूजप्रिंटवर अजय देवगन ९५.९८ गुणांसह प्रथम क्रमांकावर पोहोचलाय. तर ७५.२४ ह्या आंकडेवारीनूसार, बिग बॉसचा होस्ट सुपरस्टार सलमान खान दूस-या स्थानावर आहे. बिग बॉस १३ हा शो सध्या त्यात होणा-या अनेक वाद-विवादांमूळे खूप चर्चेत आहे.

भारतीय सिनेमाचे महानायक अमिताभ बच्चन ४९.५३ गुणांसह तिस-या स्थानावर आहेत. तर ब्लॉकबस्टर ‘कुमार’ म्हणून ओळखला जाणारा अक्षयकुमार आपल्या गुड न्यूज सिनेमाच्या सक्सेसमूळे बॉक्स ऑफिससोबतच लोकप्रियतेतही पूढे आहे. ३१.९८ गुणांसह अक्षय चौथ्या पदावर आहे. लिव्हिंग लिजेंड रजनीकांत २६.१७ गुणांसह लोकप्रियतेत पांचव्या स्थानावर आहेत.

First Published on: January 28, 2020 11:45 AM
Exit mobile version