थुकरट वाडीत येणार ‘तानाजी’

थुकरट वाडीत येणार ‘तानाजी’

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा छोट्या पडद्यावरचा अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. चला हवा येऊ द्या मध्ये मराठीच नाही तर बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे.

येत्या आठवड्यात थुकरट वाडीत तानाजी या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री काजोल आणि अभिनेता देवदत्त नागे व अजिंक्य देव हजेरी लावणार आहेत. ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर हे कलाकार येणार म्हंटल्यावर थुकरट वाडीतील विनोदवीरांनी एकच कल्ला केला. ‘प्यार तो होना हि था’ या चित्रपटावर एक विनोदी स्किट सादर करतील, ज्यात भाऊ कदम अजय देवगण आणि श्रेया बुगडे काजोलची व्यक्तिरेखा साकारणार आहेत आणि त्यांना पाहून प्रेक्षक हसून हसून लोटपोट होतील यात शंकाच नाही. या स्किटला काजोल आणि अजय यांनी भरभरून दाद दिली. धमाल मस्तीने भरलेला हा भाग प्रेक्षक ६ आणि ७ जानेवारीला पाहू शकतील.

First Published on: January 3, 2020 12:21 PM
Exit mobile version