अजय देवगणने केला ‘पॅनोरमा म्युझिक’चा श्रीगणेशा

अजय देवगणने केला ‘पॅनोरमा म्युझिक’चा श्रीगणेशा

अजय देवगणने केला'पॅनोरमा म्युझिक'चा श्रीगणेशा

सिनेनिर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री. कुमार मंगत पाठक आणि श्री. अभिषेक पाठक यांनी ‘पॅनोरमा म्युझिक’ या संगीतमय लेबलची नुकतीच घोषणा केली आहे. बॉलिवूड स्टार अजय देवगणने सोशल मीडियाच्या माध्यमातून पॅनोरमा म्युझिकच्या लेबलचं प्रमोशन करणारा व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी आपले चाहते आणि संगीतप्रेमींपर्यंत पोहोचवली असून, चॅनल सबस्क्राइब करून सुमधूर संगीताचा आस्वाद घेण्याचे आवाहनही केलं आहे.
‘पॅनोरमा म्युझिक’चे नेतृत्व राजेश मेनन करणार आहेत. या लेबलअंतर्गत ओरिजनल सिंगल्स, चित्रपट संगीत, स्वतंत्र संगीत आणि प्रादेशिक कॉन्टेंटची निर्मिती केली जाणार आहे. संगीतकारांसोबतच कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ देण्याच्या हेतूने सुरू केलेलं हे लेबल प्रादेशिक भाषेतील संगीत निर्मितीवर विशेष भर देईलच, पण यासोबतच हिंदी निर्मीती मध्ये मुख्यतः सूफी, गझल आणि भक्तिमय अशा विविध संगीतरचनांचा समावेश करण्यात येईल.(ajay devgan launches panorama music)

‘पॅनोरमा म्युझिक’च्या घोषणेच्या निमित्तानं अजय देवगण म्हणाला की, ‘संगीताचं माझ्या मनात वेगळं स्थान असल्यानं संगीताची आवड मी कायम जोपासली आहे. डिजिटल माध्यमांमुळे संगीतामधील संधी वाढल्या आहेत. भारताला एक समृद्ध संगीत परंपरा लाभली असून, यातील अद्याप अनेक पैलू समोर आलेले नाहीत. ‘पॅनोरमा म्युझिक’ हे पॅनोरमा स्टुडिओचं योग्य दिशेने टाकलेलं पाऊल असून, मी त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देतो’.


हे हि वाचा –Shilpa Shetty : शिल्पाने मनोभावे केलं विघ्नहर्त्याचं स्वागत

First Published on: September 8, 2021 5:57 PM
Exit mobile version