आयुष्मानच्या ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’मध्ये अक्षय कुमार आणि मलायका अरोराची होणार एन्ट्री

आयुष्मानच्या ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’मध्ये अक्षय कुमार आणि मलायका अरोराची होणार एन्ट्री

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना वारंवार त्याच्या नवनवीन चित्रपटांमुळे चर्चेत असतो. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आयुष्मानचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्री रकुलप्रीत सिंह देखील मुख्य भूमिकेत होती. दरम्यान, आता आयुष्मान लवकरच ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. दरम्यान, नुकताच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला असून या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार देखील झळकणार आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार फक्त एका कॅमियो सीनसाठी असेल. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय आणि आयुष्मान एकत्र काम करताना दिसणार आहेत.

चित्रपटातील आयटम साँग्समध्ये मलायका अरोरा झळकणार
या चित्रपटामधील एका खास गाण्यामध्ये मॉडेल आणि डान्सर मलायका अरोरा दिसणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या गाण्याचे नाव अद्याप समोर आलं नसलं तरी नक्कीच मलायकाचा यात अनोखा अंदाज पहायला मिळणार आहे. या गाण्याव्यतिरिक्त मलायकाने ‘दबंग’ चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम हुई’, ‘हाऊसफुल 2’ मधील ‘अनारकली डिस्को चली’ आणि शाहरुखच्या दिल से चित्रपटातील ‘छैय्या छैय्या’ यांसारख्या बऱ्याच आयटम साँग्समध्ये मलायकाने काम केले आहे.

 


हेही वाचा :

सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब

First Published on: November 11, 2022 11:49 AM
Exit mobile version