अक्षय कुमार आणि साऊथ मेगास्टार मोहनलालचा लग्नातील भांगडा व्हायरल

अक्षय कुमार आणि साऊथ मेगास्टार मोहनलालचा लग्नातील भांगडा व्हायरल

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार विविध कारणांमुळे सतत चर्चेत असतो. नुकताच एक व्हिडीओ अक्षयने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात अक्षय कोणाच्यातरी लग्नात भांगडा करताना दिसत असून त्याच्यासोबत साऊथ अभिनेता मोहन लाल देखील दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहते याला खूप पसंती देत आहेत.

अक्षयचे आगामी चित्रपट

अक्षय कुमारचा सेल्फी चित्रपट 24 फेब्रुवारी 2023 पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात इमरान हाशमी, नुसरत भरूचा आणि डायना पेंटी देखील दिसून येतील. या चित्रपटाव्यतिरिक्त अक्षय ‘ओएमजी 2’, ‘कॅप्सूल गिल’, ‘गोरखा’, ‘बड़े मिया छोटे मियां’ यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे.

 


हेही वाचा :

रुबिनाचा सुजलेला चेहरा पाहून नेटकऱ्यांना आली राखी सावंतची आठवण

First Published on: February 11, 2023 5:34 PM
Exit mobile version