अक्षय कुमारने घेतली ‘या’ मराठी दिग्दर्शकाची भेट

अक्षय कुमारने घेतली ‘या’ मराठी दिग्दर्शकाची भेट

अक्षय कुमार

‘पळशीची पीटी’ या चित्रपटाची गेले अनेक दिवस चर्चा होतीच पण शिक्षक दिनाच्या मुहूर्तावर ‘पळशीची पीटी’ या अगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं, आणि नेमकं काय आहे ‘पळशीची पीटी’ याची उत्सुकात सगळ्यांनाच लागली. यात बॉलिवूड अभिनेता खिलाडी अक्षय कुमारही मागे नाहीये. या चित्रपटाच्या विषयाची उत्सुकता त्यालाही होती. त्यामुळे अक्षयने ‘पळशीची पीटी’च्या दिग्दर्शकाची साताऱ्यात भेट घेतली.

अक्षय कुमारने घेतली पळशीची पीटीच्या दिग्दर्शकाची भेट

सध्या अक्षयकुमार आपल्या आगामी ‘केसरी’ चित्रपटाचं साताऱ्यात शूट करत आहे. साताऱ्यात शूट सुरू असताना साताऱ्यातील एका दिग्दर्शकाने ‘पळशीची पीटी’ हा चित्रपट तयार केला आहे, ज्या चित्रपटाची ‘कान्स’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे.  असं अक्षयला समजताच त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते धोंडिबा कारंडे यांना ‘केसरी’च्या सेटवर बोलवून त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर ‘पळशीची पी.टी.’ ची कथा आणि सर्वांनी मिळून या चित्रपटाला एक कलाकृती म्हणून कसं तयार केलं, त्यासाठी घेतलेली मेहनत अक्षयने जाणून घेतली, आणि त्याने संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या.

पळशीची पीटी

या पुरस्काराने गौरव

प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. अनेक चित्रपट महोत्सवामधून ‘पळशीची पीटी’ या चित्रपटाला गौरवण्यात आलं होतं. चित्रपटाने . संस्कृती कलादर्पण पुरस्कार, महाराष्ट्र शासन विशेष पुरस्कार यांसारखे पुरस्कार आपल्या नावावर केले. तर कान्स फिल्म फेस्टिव्हल, गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट गौरवला गेला.

चित्रपटाच्या नावामुळे उत्सुकता

‘पळशीची पीटी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन धोंडिबा कारंडे यांनी केलं आहे. ‘पळशीची पीटी’ या नावामुळे मात्र प्रेक्षकांच्या मनात नेमका हा चित्रपट कशावर अधारीत आहे याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नावावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. हा चित्रपट भारताची धावपटू पी.टी उषा हीच्या जिवनावर आधारीत असल्याचेही म्हटल जातय.

येत्या ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र नेमक्या कोणत्या तारखेला ? यात कोण कोण कलाकार असणार ?नेमकी या चित्रपटाची कथा काय आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

First Published on: September 10, 2018 1:44 PM
Exit mobile version