बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण

अभिनेता अक्षय कुमार

राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नेते आणि सेलिब्रिटींना कोरोनाने विळखा घातला आहे. आता यामध्ये पुन्हा एका सेलिब्रिटीची भर पडली आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांने स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

काय म्हणाला अक्षय कुमार?

“माझा आज सकाळी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी सध्या घरातच क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी दिलेले सर्व उपचार घेत आहे. मात्र, माझ्या संपर्कात येणाऱ्यांनी स्वत:ची काळजी घ्या. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी देखील कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी ट्विटरद्वारे केले आहे”.

कसे आहात लॉकडाऊनचे पर्याय?

आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असून रूग्णसंख्या अशीच वाढली, तर उपलब्ध असलेला ऑक्सिजनही पुरणार नाही अशी भीती व्यक्त केली. सध्या उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचा पुरवठा कोरोना काळात औद्योगिक विभागासाठी २० टक्के आणि सार्वजनिक आरोग्यासाठी ८० टक्के दिला जातो. मागील १५ दिवसात वाढणारे कोरोना रूग्ण पाहता आता तो १०० टक्के सार्वजनिक आरोग्यासाठी वापर केला जाईल, असे संकेतही या अधिकाऱ्यांनी दिले.


हेही वाचा – अभिनेते आणि दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन


 

First Published on: April 4, 2021 10:05 AM
Exit mobile version