अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड 2’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 2012 साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘ओह माय गॉड’ चित्रपटाने त्यावेळी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. आजही प्रेक्षक आवडीने हा चित्रपट पाहतात. दरम्यान, आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारने एक पोस्टर शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत.

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘ओह माय गॉड 2’

यामी गौतम देखील साकारणार महत्त्वाची भूमिका

मागील अनेक दिवसांपासून अक्षयचा हा चित्रपट ओटीटीवरुन प्रदर्शित केला जाणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आता हा चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात यामी गौतम आणि पंकज त्रिपाठी देखील मुख्य भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित रायने केलं आहे. हा चित्रपट भारतातील लैंगिक शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर आधारित असणार आहे.

‘या’ चित्रपटात दिसणार अक्षय

‘ओह माय गॉड 2’ व्यतिरिक्त अक्षय ‘हेरा फेरी 3′,’वीर दौडले सात’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे. अक्षयचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करतील की नाही याकडे सर्वांचेच लक्ष असेल.

 


 हेही वाचा :

स्वतःचा आनंद स्वतः निवडला… दुसऱ्या लग्नानंतर ट्रोल झालेल्या आशिष विद्यार्थींनी दिलं ट्रोलर्सला उत्तर

First Published on: June 9, 2023 11:20 AM
Exit mobile version