हॉलिवूड चित्रपटाच्या सेटवर चुकून गोळीबार, सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू, दिग्दर्शक जखमी

हॉलिवूड चित्रपटाच्या सेटवर चुकून गोळीबार, सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू, दिग्दर्शक जखमी

हॉलिवूड चित्रपटाच्या सेटवर चुकून गोळीबार, सिनेमाटोग्राफरचा मृत्यू, दिग्दर्शक जखमी

हॉलिवूड चित्रपट ‘रस्ट’च्या सेटवर चुकून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकन अभिनेता एलेक बाल्डविनकडून चुकून झालेल्या या गोळीबारात एका सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू झाला आहे, तर एक दिग्दर्शक गंभीररित्या जखमी झाला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे खऱ्याखुऱ्या बंदुकीचा वापर या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान केला जात होता. त्यामुळे सिने जगतात एकचं खळबळ माजली आहे. तर अनेकांनी सिनेमॅटोग्राफरच्या दुर्दैवी मृत्यूवर हळहळ व्यक्त केली आहे.

न्यू मेक्सिकोमधील बोनान्स क्रिक रेंच सेटवर गुरुवारी २१ ऑक्टोबरदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे. हॉलिवूड अभिनेता एलेक बाल्डविनच्या आगामी ‘रस्ट’ सिनेमाचे शूटिंग सुरु होते. यावेळी एका सीन शूटमध्ये बंदूकीचा वापर केला जात होता. अचानक अभिनेता एलेक बाल्डविनच्या हातातील एका प्रॉप बंदूकीतून गोळी सुटली आणि ती थेट सिनेमॅटोग्राफर हलिन हचिन्स यांना जाऊन लागली. या गोळीबारात ४२ वर्षीय सिनेमॅटोग्राफर हलिन हचिन्स हीचा मृत्यू झाला. तर दिग्दर्शक जोएल सुजा (४८) गंभीर जखमी झाले आहेत.

हालिन हचिन्सला हीला हॉलिकॉप्टरने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारांआधीच तिने प्राण सोडले. तर जोएल सुजा यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे. मात्र अद्याप कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही. ही प्रॉप गन नेमकी कशी होती? यात कोणत्या प्रकारचा दारुगोळा वापरला होता याचा पोलीस तपास सुरु आहे.

मात्र या घटनेवर अभिनेता बाल्डविन, जोएल सुजा आणि सेटवरील इतर कलाकार, कर्मचाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अनेक हॉलिवूड कलाकारांकडून हलिन हचिन्सला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

हलिन हचिन्सचे हॉलिवूड कलाक्षेत्रातील मित्र जेम्स कलम, जॅक कॅसवेल आणि टीना प्रेस्ली बोरेकने यांनी भावनिक शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र या घटनेमुळे केवळ हॉलिवूडचं नाही तर बॉलिवूडकडून देखील हळहळ व्यक्त होतेय. सिनेमॅटोग्राफर हलिन हचिन्स ही एक हॉलिवूड विश्वातील नवोदित सितारा होती. एका सैनिक पित्याची ती मुलगी होती.


१०० कोटी लसपूर्तीसाठी मोदींकडून देशवासीयांचे कौतुक, मास्क वापरावर म्हणाले…

First Published on: October 22, 2021 11:44 AM
Exit mobile version