घरदेश-विदेश१०० कोटी लसपूर्तीसाठी मोदींकडून देशवासीयांचे कौतुक, मास्क वापरावर म्हणाले...

१०० कोटी लसपूर्तीसाठी मोदींकडून देशवासीयांचे कौतुक, मास्क वापरावर म्हणाले…

Subscribe

भारताने कोरोनाविरोधी लसीचा केवळ ९ महिन्यांत १०० कोटींहून अधिक लसीकरणाचा टप्पा पार करत एक नवीन विक्रम रचला आहे. भारताच्या लसीकरणाच्या यशस्वी कामगिरीबद्दल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदींनी १०० कोटी लसीचे डोस हा केवळ एक आकडा नाही. यातून देशाच्या सामर्थ्य़ाचे प्रतिबंब दिसले असे म्हणत देशावासीयांचे कौतुक केले. याशिवाय मास्कवर भाष्य करत, नागरिकांना भविष्यातही मास्कचा वापर करावा लागेल असे संकेत दिले.

“या यशामागे १३० कोटी देशवासियांची शक्ती”

यावेळी पंतप्रधान मोदींनी कृतं म्ये दक्षिणे हस्ते जयो मे सभ्य आहित: या वेध वाक्याने आपल्या संबोधनाला सुरुवात केली. या वेधाचा अर्थ स्पष्ट करत मोदी म्हणाले की, ”या वाक्याला भारताच्य़ा दृष्टीने विचार करायचा झाल्यास सरळ अर्थ आहे. आपल्या देशाने एकीकडे कर्तव्य़ाचे पालन केले तर दुसरीकडे याचा मोठ्याप्रमाणात यशही मिळाले. २१ ऑक्टोबरला १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण करणं कठीण असाधारण गोष्ट साध्य केली आहे. या यशामागे १३० कोटी देशवासियांची शक्ती लागली आहे. यासाठी हे यश भारताचे. प्रत्येक देशवासियांचे यश आहे. असं म्हणत मोदींनी देशवासियांचे मनापासून अभिनंदन केले.

- Advertisement -

ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांनी मास्क आवश्य घाला आणि ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांनी लोकांना लस घेण्यासाठी प्रेरित करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.

“१०० कोटी केवळ आकडा नाही, देशाच्या सामर्थ्य़ाचे प्रतिबंब”

”१०० कोटी लसीचे डोस हा केवळ एक आकडा नाही. यातून देशाच्या सामर्थ्य़ाचे प्रतिबंब दिसले. देशाच्या इतिहासच्या नव्या अध्ययाची सुरुवात आहे. ही अशा भारताची प्रतिमा आहे जो कठीण गोष्ट शक्य करु शकतो. ही अशा नव्या भारताची प्रतिमा आहे, जो परिश्रमाची पराकाष्टा करत आहे. आज अनेक लोक भारतातील लसीकरण मोहिमेची तुलना जगातील दुसऱ्या देशासोबत करातायत. भारताने ज्या वेगाने १ कोटीचा आकडा पार केला आहे याचं कौतुक होतेय. मात्र या विश्लेषणात एक गोष्ट राहून जातेय की, आपण ही सुरुवात नेमकी कुठून केली? जगातील दुसऱ्या बड्या देशांना लसीकरण संशोधन करणं, त्याचा शोध घेण्यासाठीची अनेक दशकांचे परिश्रम होते. मात्र भारत या देशांनी बनवलेल्या लसींवरचं अवलंबून होता. मात्र १०० वर्षातील सर्वात मोठी महामारी आल्याने भारतावर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. की भारत या जागतिक महामारीसह लढू शकतो? दुसऱ्या देशांकडून लसी खरेदी करण्यासाठी एवढे पैसे कुठून आणेल? भारताला एवढ्या लस केव्हा मिळतील? भारतीयांना लस मिळेल की नाही? भारत एवढ्या लस देऊ शकेल का? अनेक प्रश्न होते. परंतु आज १०० कोटी लसीकरणाने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. भारताने नागरिकांना सर्वांना १०० कोटी लसीचे डोस दिले आणि तेही मोफत असे पंतप्रधान म्हटले आहे.

- Advertisement -

“भारत कोरोनापासून स्वत:ला सर्वात सुरक्षित मानेल असाही १०० कोटी लसीचा प्रभाव दिसणार आहे. एक फार्मा हब म्हणून भारताला स्वीकृती आणि मजबूती मिळाली आहे. पूर्ण जगाला भारताच्या ताकदीचे दर्शन घडलंय. भारताच्या लसीकरण मोहिम हे ‘सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास’चे सर्वात जिवंत उदाहरण आहे. आजार सर्वांनाच होतो. त्यामुळे त्यावर व्हीआयपी कल्चरचा प्रभाव होऊ नये. केवळ व्हीआयपी लोकांनाच लस मिळू नये याची काळजी घेण्यात आली. कितीही श्रीमंत असला तरी त्याला सामान्य नागरिकांप्रमाणेच ट्रीटमेंट मिळेल हे पाहिलं. त्यामुळेच सर्वांना लस मिळू शकली” असं ते म्हणाले. त्याच वेळी, १०० कोटी लसीचे डोस देऊन, भारताने त्या लोकांना उत्तर दिले जे प्रश्न उपस्थित करत होते की भारतातील लसीबद्दलचा संकोच कसा दूर होईल,” असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, साथीच्या विरूद्ध देशाच्या लढाईत आम्ही लोकसहभागातून लढली ही आपली पहिली ताकद बनवली आहे. देशाने टाळ्या वाजवल्या, थाळी वाजवल्या, दिवे लावले त्यातून एकतेला ऊर्जा देण्यासाठी प्रयत्न केले, पण काही लोक म्हणाले होते की, असा रोग पळून जाईल का? पण यातून सर्वांनी  देशाची एकता, सामूहिक शक्तीचे प्रबोधन पाहिले.

स्टार्ट-अप रेकॉर्ड बनवत आहेत

“देश आणि परदेशातील तज्ञ आणि अनेक संस्था भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल खूप सकारात्मक आहेत. आज भारतीय कंपन्यांमध्ये केवळ विक्रमी गुंतवणूक येत नाही तर तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत. स्टार्ट-अपमध्ये विक्रमी गुंतवणुकीमुळे, स्टार्ट-अप रेकॉर्ड बनवत आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.

“ज्याप्रमाणे स्वच्छ भारत अभियान हे एक जनआंदोलन आहे, त्याचप्रमाणे, भारतात बनवलेल्या वस्तू खरेदी करणे, भारतीयांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करणे, स्थानिकांसाठी आवाज उठवणे, हे आपण आचरणात आणले पाहिजे. मी तुम्हाला पुन्हा सांगेन की आपण प्रत्येक लहान वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरला पाहिजे, जी भारतात बनली आहे,” असे मोदी म्हणाले.

कोविन प्लॅटफॉर्म जगातील आकर्षणाचे केंद्र

पीएम मोदी म्हणाले की, आपल्या देशाने बनवलेली कोविन प्लॅटफॉर्मची प्रणाली देखील जगातील आकर्षणाचे केंद्र आहे. भारतात बनवलेल्या कोविन प्लॅटफॉर्ममुळे सामान्य लोकांना केवळ सुविधाच मिळाली नाही तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे कामही सोपे झाले आहे. ते म्हणाले की, प्रत्येक छोटीशी गोष्ट, जी #MadeInIndia आहे, ज्याला एक भारतीय घाम गाळतो, ती खरेदी करण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. आणि हे प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळेच शक्य होईल. भारतीयांनी बनवलेल्या वस्तू खरेदी करणे, #VocalForLocal होण्यासाठी, आपण हे व्यवहारात आणले पाहिजे.

‘सुरक्षा कितीही उत्तम असेल किंवा आधुनिक असेल तरी जोपर्यंत युद्ध सुरु आहे तोपर्यंत शस्त्र टाकायची नाहीत. सणासुदीच्या काळात कोरोनाचे नियम पाळा, मास्क घाला, गर्दी टाळा. गेल्या दिवळीपेक्षा यंदाची परिस्थिती चांगली आहे. मात्र, कोरोना नियमांचं पालन करा. मोठी आव्हानं कशी पेलायची हे भारताला चांगलेच माहित आहे. यासाठी आपल्याला सावध राहायला हवं. निष्काळजीपणा करुन चालणार नाही, असे मोदींनी आवाहन केले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -