राजामौलीच्या ‘RRR’ साऊथ सिनेमात आलिया भट्ट-अजय देवगनचे पदार्पण

राजामौलीच्या ‘RRR’ साऊथ सिनेमात आलिया भट्ट-अजय देवगनचे पदार्पण

राजमौलीच्या 'RRR' साऊथ सिनेमात आलिया भट्ट-अजय देवगनचे पदार्पण

भारतीय सिनेमात बाहूबली सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमा करणारे दिग्दर्शक एस एस राजामौली मल्टीस्टारर सिनेमा ‘RRR’ येत आहे. या सिनेमात असणारी संपुर्ण स्टार कास्ट आणि सिनेमा रिलीज होण्याची तारिख दिग्दर्शक राजामौली यांनी हैद्राबाद येथील एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले. बाहुबलीचे दिग्दर्शक एस एस राजामौलीचा रामा रावणा राज्यम (RRR) हा सिनेमा ३० जुलै २०२० मध्ये सर्वत्र रिलीज होईल.

हा सिनेमा तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम तसेच, इतर भारतीय भाषांमध्ये रिलीज होईल. या सिनेमात असणाऱ्या स्टारकास्टमध्ये आलिया भट्ट आणि अजय देवगन हे देखील आहे. आलिया या सिनेमात असेल की, नाही याविषयी चर्चा सुरू होती. परंतु, आता RRR या सिनेमातून आलिया साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणार आहे.

या सिनेमात आलिया मुख्य भुमिकेत असून ती राम चरण सोबत दिसणार आहे. यासोबतच आलिया मुख्य भुमिकेत असली तरी ती शक्तीशाली व्यक्तीरेखेत दिसेल. ” या सिनेमातील महत्त्वपुर्ण भुमिका साकारण्यासाठी अजय देवगण होकार दिलाच. परंतु, RRR या सिनेमाचा एक हिस्सा झालो यासाठी आनंदी आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगच्या तारखा देण्यात येतील.” असे राजामौलीनी अजय देवगनच्या भुमिकेवर बोलतांना सांगितले.

 १९२० मधील प्रसंगावर आधारलेला सिनेमा 

सिनेमाच्या कथानकाबद्दल बोलतांना राजामौली सांगितले, “हा सिनेमा काल्पनिक कथेवर अवलंबूनअसून दोन खऱ्या व्यक्तींवर आधारित आहे. हा सिनेमा भव्य स्वरूपात असणार आहे. या सिनेमाकरिता खुप संशोधन केले गेले आहे.”
RRR हा सिनेमा दोन स्वतंत्र सेनानी (अल्लूरी सीतारामा राजू-कोमाराम भीम) यांच्यावर आधारित आहे. १९२० या काळातील प्रसंगावर आधारलेली असणार आहे. सिनेमाच्या तारखेसोबत सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आली आहे. ३५०-४०० करोड इतका बजेट असून या सिनेमात ज्यूनियर एनटीआर आणि राम चरण यांचा एग्रेसिव लूक बघायला मिळणार आहे.

First Published on: March 14, 2019 4:33 PM
Exit mobile version