आलिया रणबीरचे यंदा कर्तव्य, ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

आलिया रणबीरचे यंदा कर्तव्य, ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

आलिया रणबीर यंदाच होणार शुभ मंगल, 'या' अभिनेत्रीने केला खुलासा

बॉलिवूडचे लाडके कपल आणि सतत चर्चेत असणारे आलिया (Alia Bhatt) आणि रणबीर (Ranbir Kapoor)  लग्न कधी करणार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दोघांच्या लव्ह स्टोरीची अनेक वेळा चर्चा होत असते. आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेय कारण दोघेही याच वर्षी लग्न करणार असल्याचा खुलासा प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्त हिने केला आहे. लारा तिच्या आगामी सिनेमा ‘बेल बॉटम’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यावेळी एका मुलाखतीत बोलत असताना लाराने आलिया आणि रणबीर यांच्या नात्याविषयी खुलासा केला. त्यामुळे आलिया रणबीर या क्यूट कपलच्या लग्नाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्यात. दोघांच्या कुटुंबियांनी गपचूप लग्नाची तयारी करायला घेतल्याचे देखील समजते. (Alia Bhatt and Ranbir kapoor will get married this year, Lara Dutt revealed)

टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री लारा दत्त हिने आलिया आणि रणबीर यांच्या नात्यावर भाष्य केले. ‘मला वाटत आलिया आणि रणबीर यावर्षातच लग्न करतीलट’ खरंतर काही दिवसांपासून रणबीर कपूरने देखील एका मुलाखतीत, ‘जर कोरोना लॉकडाऊन नसत तर आतापर्यंत आमचे लग्न झाले असते’, असे म्हटले होते. त्यामुळे लाराच्या या खुलास्यानंतर आलिया आणि रणबीर यांचे यंदा कर्तव्य असल्याचे समजते.

आलिया आणि रणबीर यांच्या नात्याला आता ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आलिया रणबीरच नाही तर त्यांच्या कुटुंबिय देखील त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागली आहे. रणबीर आणि आलिया लग्नानंतर वांद्रे येथील त्यांच्या नव्या घरी शिफ्ट होण्याच्या तयारीत आहेत. दोघेही ब्रम्हास्र या त्यांच्या आगामी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. बऱ्याच वर्षांनी आलिया आणि रणबीर दोघेही एकाच पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहेत.

अभिनेत्री लारा दत्त देखील आलिया आणि रणबीर यांच्या लग्नासाठी उत्सुक असल्याचे दिसून आलेय. लारा सध्या बेट बॉटम सिनेमातील तिच्या दमदार लुकमुळे चर्चेत आहे. लारा या सिनेमात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.


हेही वाचा – शिल्पा शेट्टी व तिच्या आईने ‘सलून आणि स्पा’च्या नावाने लुबाडले कोट्यवधी रुपये

First Published on: August 9, 2021 4:31 PM
Exit mobile version