घरमनोरंजनशिल्पा शेट्टीला अटक होणार? लखनऊ पोलीस मुंबईत दाखल

शिल्पा शेट्टीला अटक होणार? लखनऊ पोलीस मुंबईत दाखल

Subscribe

शिल्पा आणि तिच्या आई विरुद्द 2 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणीत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. शिल्पाचा पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी अटक केल्यानंतर आता शिल्पा आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांच्यावर कोट्यवधी रुपयांचा घोटळा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.  उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये शिल्पा व तिच्या आई विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार शिल्पा आणि तिच्या आई विरुद्द 2 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे आता शिल्पा अडचणीत चांगलीच वाढ होत असल्याचे दिसतेय. आता शिल्पाला अटक होणार का? असा प्रश्न समोर आला आहे. (Shilpa Shetty to be arrested? Lucknow police filed in Mumbai) संबधीत गुन्ह्याची दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शिल्पाला व तिच्या आईला म्हणजेच सुनंदा शेट्टीला नोटीस पाठवली. पुढील तपास करण्यासाठी लखनऊ पोलीसांची टीम मुंबईत आली होती. तसेच जर काही ठोस पुरावे समोर आल्यास शिल्पा व तिच्या आईला अटक होण्याची शक्यता आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण

शिल्पा आणि तिच्या आईने ऑयसिस स्लिमिंग स्किल सलून अँन्ड स्पा या नावाने एक कंपनी स्थापन केली होती. या कंपनी अंतर्गत एक फ्रँन्चायझी देण्याचे ऑफर देत शिल्पा व तिच्या आईने तब्बल कोट्यवधी रुपये लूबाडल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच त्यांनी कोणतीही फ्रँन्चायझी दिली नाहीये असा आरोप करण्यात आला. गुन्हा दाखल कलेल्या महिलेने कंपनीच्या लोकांनी दोन वेळेस तिच्या कडून दिड कोटी रुपयांची मागणी केली होती अशी माहिती पोलिसांना दिली आहे.

- Advertisement -

 


हे हि वाचा – HBD Mahesh babu: पहिल्याचं भेटीत पडले एकमेकांच्या प्रेमात, नम्रता शिरोडकर आणि महेश बाबूची भन्नाट लव्हस्टोरी

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -