Alia Bhatt Birthday : आलियाचे 5 सुपरहिट चित्रपट

Alia Bhatt Birthday : आलियाचे 5 सुपरहिट चित्रपट

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा आज 31वा वाढदिवस आहे. 15 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये आलियाचा जन्म झाला होता. आलियाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. आलियाने 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संघर्ष’ चित्रपटामध्ये वयाच्या सहाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर आलियाने 2012 मधील करण जौहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आलियाच्या करिअरची खरी सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत आलियाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करुन बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटवली आहे.

‘हे’ आहेत आलियाचे 5 सुपरहिट चित्रपट


2018 मध्ये प्रदर्शित झालेला ‘राझी’ चित्रपटात आलियाने दमदार भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉगबस्टर ठरला.


2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गली बॉय’ चित्रपटात आलियाने सफीना ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.

2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटात आलियाने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट सत्य कथेवर आधारित आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.


2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात आलियाने ईशा ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉगबस्टर ठरला.


2017 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बद्री की दुल्हनिया’ चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.


हेही वाचा :

देसी गर्ल प्रियंका लेकीसोबत एअरपोर्टवर स्पॉट

First Published on: March 15, 2024 1:00 PM
Exit mobile version