Gangubaiची कथा ऐकून पळून गेली होती आलिया, भन्साळींवर आली होती रडण्याची वेळ

Gangubaiची कथा ऐकून पळून गेली होती आलिया, भन्साळींवर आली होती रडण्याची वेळ

Gangubaiची कथा ऐकून पळून गेली होती आलिया, भन्साळींवर आली होती रडण्याची वेळ, वाचा धम्माल किस्सा

Gangubai Kathiawadi : सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री आलिया भट्टच्या गंगूबाई काठीयावाडी या सिनेमाची. संजय लीला भन्साळी यांनी पुन्हा एक नवा प्रयोग प्रेक्षकांसमोर आणलाय ज्यात आलियाचा नवा अवतार पाहायला मिळत आहे. सिनेमाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. गंगूबाई काठीयावाडी यांच्या जिवनावर आधारीत या सिनेमात आलिया त्यांची मुख्य भूमिका साकारत आहे. भन्साळींनी एकदा ठरवलं की ते ती गोष्ट केल्याशिवाय राहत नाही. आलियाच गंगूबाईंची भूमिका करणार हे लक्षात ठेवून भन्साळींनी आलियाला सिनेमाची कथा ऐकवली. मात्र त्यानंतर जे झाले तेव्हा भन्साळींवर रडण्याची वेळ आली होती.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केलाय. ते म्हणालेत, मी जेव्हा आलियाला सिनेमाची कथा ऐकवली. तेव्हा ती स्वत:ची बॅग घेऊन माझ्या ऑफिसमधून पळून गेली होती. मला काही कळलंच नाही. माझ्यावर रडण्याची वेळ आली. मी प्रोडक्शनच्या सीईओला सांगितलं की, आलिया मला या रोलसाठी परफेक्ट वाटत होती पण आपल्याला आता नवीन अभिनेत्री शोधावी लागणार आहे.

भन्साळी पुढे म्हणाले, आम्ही दुसरी अभिनेत्री शोधण्यासाठी सुरुवात करणार तोच दुसऱ्या दिवशी मला आलियाचा फोन आला आणि ती म्हणाली मला तुम्हाला भेटायचे आहे. मी तिला नकार देत पर्सली भेटण्यासाठी नकार दिला. तर समोरुन ती हसत हसत म्हणाली तुम्हाला मला भेटावं लागेल कारण तुम्ही माझ्याकडून जी भूमिका करुन घेऊ इच्छित आहात ती भूमिका करण्यासाठी मी तयार आहे. आलियाच्या या फोननंतर आमचं अर्ध कामच झालं आणि आज आलियाच सिनेमाची मुख्य अभिनेत्री आहे.

गंगूबाई काठीयावाडी हा सिनेमा येत्या २५ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुंबईतील एकेकाळची माफिया क्विन गंगूबाई काठीयावाडी यांच्या आयुष्यातील प्रवास, खडतर टप्पे सिनेमात दाखवण्यात येणार आहे. सिनेमातील गाणी रिलीज झाली असून आलियाचा धमाकेदार डान्स त्यात पाहायला मिळत आहे. गंगूबाई काठीयावाडी पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्साही असल्याचे दिसत आहे.

 


हेही वाचा –  Farhan Akhtar- Shibani Dandekar मराठमोळ्या पद्धतीने करणार लग्न, हळदी समारंभाला झाली सुरुवात

First Published on: February 18, 2022 8:30 AM
Exit mobile version