आलियाचा ‘डार्लिंग्स’आता तमिळ, तेलुगू भाषांमध्ये देखील होणार प्रदर्शित

आलियाचा ‘डार्लिंग्स’आता तमिळ, तेलुगू भाषांमध्ये देखील होणार प्रदर्शित

बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेत्री शेफाली शाह यांचा डार्लिंग्स चित्रपट नुकत्याच काही दिवसांपूर्वी ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. आलिया भट्टच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कौटुंबिक अत्याचारावर आधारित डार्क कॉमेडी चित्रपट पाहून प्रेक्षकांकडून चित्रपटाचं कौतुक केलं जात आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे निर्माते हा चित्रपट तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये देखील बनवण्याचा विचार करत आहेत. याबाबत या चित्रपटाचे प्रोड्यूसर आणि शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या साओओ गौरव वर्मा यांनी कन्फर्म केलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, गौरव वर्मा आणि त्यांच्या टीमने आलिया भट्टच्या डार्लिंग्स चित्रपटाच्या तमिळ आणि तेलुगू भाषेतील स्क्रिप्टवर काम करायला सुरूवात केली आहे. फक्त तमिळ आणि तेलुगू भाषाचं नाही तर हा चित्रपट ते इतर भाषांमध्ये देखील तयार करणार आहेत. परंतु या चित्रपटाची गोष्ट हुबेहुब असणार आहे. यामध्ये काही बदल केला जाणार नाही. मात्र या चित्रपटाची गोष्ट मुंबई मधील आहे. त्यामुळे तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये या चित्रपटाचं ठिकाण आणि भूमिका बदलण्यात येतील.

आलियाच्या ‘डार्लिंग्स’ला झाला होता विरोध
मागील काही दिवसांपूर्वी या चित्रपटाला सोशल मीडियावर विरोध होत होता. यामागचं कारण म्हणजे लोकांच्या मते, या चित्रपटामध्ये एका पुरूषासोबत होणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराला डार्क कॉमेडी म्हणून दाखवण्यात आलं आहे. अनेक लोक या चित्रपटाच्या कंसेप्टवर नाराजी व्यक्त करत होते. प्रेक्षकांच्या मते, आलियाच्या या चित्रपटामध्ये मनोरंजनाच्या नावाखाली फक्त पुरूषांवर कौटुंबिक हिंसाचाराला दाखवण्यात आला आहे.


हेही वाचा :ललित मोदीसोबतच्या नात्याचा खुलासा केल्यानंतर सुष्मिता सेन एक्स बॉयफ्रेंडसोबत

First Published on: August 11, 2022 10:58 AM
Exit mobile version