अक्षयसोबतच ‘या’ कलाकारांनीही दिल्या आलिया-रणबीरला शुभेच्छा

अक्षयसोबतच ‘या’ कलाकारांनीही दिल्या आलिया-रणबीरला शुभेच्छा

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट मागील अनेक दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे खूप चर्चेत होती. दरम्यान आज सकाळीच आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही आनंदाची बातमी काही वेळातच वाऱ्यासारखी पसरली. आलिया-रणबीरला मुलगी झाल्याचं कळताच मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. आलियाने ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी सोशल मीडिया अकाऊंटवर एक खास पोस्ट शेअर केली. त्या पोस्टवर आता अनेकजण प्रतिक्रिया देत आहे.

अक्षय, माधुरी यांनीही दिल्या शुभेच्छा
आलियाने शेअर केलेल्या या पोस्टखाली शुभेच्छा देत अक्षय कुमारने लिहिलंय की, “रणबीर-आलिया माझ्याकडून तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. मुलीला जन्म देणं जगातील सर्वात मोठा आनंद आहे. देव तुमच्या दोघांची रक्षा करो.”

दरम्यान, आज सकाळी 7:30 च्या सुमारास आलिया डिलीव्हरीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. आज दुपारी आलियाने मुलीला जन्म दिला.

जून महिन्यात दिली होती गोड बातमी
यंदा एप्रिल महिन्यात आलिया आणि रणबीर कपूरचं लग्न झालं. त्यानंतर दोन महिन्यांनी आलिया प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली. आलिया आई होणार असल्याची बातमी तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दिली होती. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या सोबत रणबीर देखील होता. मात्र, त्यानंतर अनेकांनी आलियाला ट्रोल देखील केलं होतं.

 


हेही वाचा :

आलियाने दिला गोंडस मुलीला जन्म; कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण

First Published on: November 6, 2022 6:53 PM
Exit mobile version