“जयंती”चे तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण

“जयंती”चे तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण

"जयंती"चे तिसऱ्या आठवड्यात यशस्वी पदार्पण

दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित “जयंती” सिनेमा दिनांक १२ नोव्हेंबर पासून सर्वत्र प्रदर्शित झाला. संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला हा चित्रपट सिनेमघरात “बॉलिवूड सिनेमांची” मक्तेदारी असतानादेखील तिसऱ्या आठवड्यात थाटाने उभा आहे. लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या पहिल्या मराठी चित्रपटाला प्रेक्षकवर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.

महाराष्ट्रात, विशेष म्हणजे विदर्भातून विशेष प्रेम मिळत आहे. वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिथे मराठी चित्रपट कमी प्रमाणात लागतात तेथेदेखील जयंती तग धरून बसला आहे. त्याप्रमाणेच मुंबई, पुणे, नागपूर औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरातदेखील “जयंती” दिमाखात साजरी होत आहे. आता या सिनेमाची ख्याती सातासमुद्रापार देखील पसरली आहे. ऑस्ट्रेलिया, लंडन, कॅनडा आणि दुबई या देशातील सिनेमघरात जयंती हा सिनेमा दाखवला जाणार आहे. प्रेक्षकवर्ग खऱ्या अर्थाने जगभरात जयंती साजरी करत असल्याचे स्पष्ट होत आहे.

या चित्रपटातून पदार्पण करणारा अभिनेता “ऋतुराज वानखेडे” च्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे. काही सिनेमघरांमध्ये त्याने स्वतः हजर राहून चाहत्यांना “सरप्राईज” दिले तेव्हा त्याची एक झलक पाहण्यासाठी लोकांची तुडुंब गर्दी झाली. अशा प्रकारचा प्रतिसाद खूप कमी चित्रपटांना मिळतो आणि “जयंती” त्यापैकी एक आहे.

या सिनेमा पाहण्यासाठी लोकांची गर्दी तर होतेय, पण सिनेमाच्या निर्मात्यांना अजूनही स्क्रीन मिळण्यासाठी कष्ट घ्यावे लागत आहे. काही बॉलिवूड चित्रपटांमुळे अजूनही जयंती ला ही कळ सोसावी लागत आहे. यासंदर्भात जयंती सिनेमाचे दिग्दर्शक शैलेश नरवाडे सांगतात, “जयंती यशस्वीपणे तिच्या तिसऱ्या आठवड्यात आली आहे ही आमच्यासाठी खरचं आनंदाची बाब आहे, चित्रपट प्रदर्शनासाठी आम्ही सर्वात पहिले पाऊल उचलण्याचा आमचा निर्णय फोल ठरला नाही याचा आम्हाला गर्व आहे. तरीही, आजही आम्हाला स्क्रीन मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे पण चित्रपटाचा विषय आम्हाला सतत नवी ऊर्जा देण्याचं काम करतोय आणि आम्हाला खात्री आहे की नक्कीच याचे सकारात्मक पडसाद उमटत राहतील”


हेही वाचा – …म्हणून सोडली अपूर्वाने ‘शेवंता’ची भूमिका

First Published on: November 26, 2021 2:41 PM
Exit mobile version