ॲमेझॉन प्राईम व्हीडिओच्या वतीने मनोरंजनपट ‘जुगजुग जिओ’च्या डिजीटल प्रीमिअरची घोषणा

ॲमेझॉन प्राईम व्हीडिओच्या वतीने मनोरंजनपट ‘जुगजुग जिओ’च्या डिजीटल प्रीमिअरची घोषणा

अॅमेझॉन प्राईम व्हीडिओच्या वतीने आज कौटुंबिक मनोरंजनपट, जुगजुग जिओच्या विशेष स्ट्रीमिंग प्रीमिअरची घोषणा करण्यात आली. भारत आणि 240 देश, प्रदेशांतील प्राईम मेंबरना आज, 22 जुलै 2022 पासून सिनेमा पाहता येईल. राज मेहता दिग्दर्शित आणि धर्मा प्रॉडक्शन व व्हायकॉम 18 स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित विनोदी-नाट्यात सुप्रसिद्ध अनिल कपूर आणि नीतू कपूर सह सुपरस्टार वरूण धवन, कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच युट्यूबर प्राजक्ता कोळी हिचा हा पदर्पणातील सिनेमा असून अभिनेता-निवेदक म्हणून आपली ओळख निर्माण केलेल्या मनीष पॉल ची सिनेमात महत्त्वाच्या व्यक्तिरेखेत दिसेल.

जुग जुग जिओ हा प्राईम व्हीडिओज प्राईम डे 2022 च्या मालिकेतील भाग आहे. या मालिकेत अनेक भाषांमधील अॅमेझॉन ओरिजनल सिरीज आणि ब्लॉकबस्टर सिनेमांचा समावेश असून आता अगोदरपासूनच सेवेवर उपलब्ध आहे. त्याशिवाय, प्राईम मेंबर या आकर्षक सवलतीचा लाभ प्राईम व्हीडिओ चॅनल्सवर उपलब्ध 13 लोकप्रिय व्हीडिओ स्ट्रीमिंग सेवेत सर्वाधिक अॅड-ऑन सबस्क्रिप्शनची खरेदी करताना मिळेल. 23 आणि 24 जुलै हे भारतात प्राईम डे आहेत.

“जुग जुग जिओचा अनुभव अद्वितीय होता, इतक्या सुंदर सह-कलाकार, टीमचे आभार. या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम लाभले,” पुढे वरूण धवन सांगतो, “कुलदीप सैनी वठवणे आव्हानात्मक तरीही फायद्याचे होते. ही अशी व्यक्तिरेखा अगोदर साकारली नव्हती. त्यामुळे माझ्या मनात या सिनेमाची विशेष जागा आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अतिशय यशस्वी ठरला आणि आजपासून अॅमेझॉन प्राईम व्हीडिओवर स्वत:च्या घरांत बसून प्रेक्षकांना त्याची मजा लुटता येणार असल्याचा आनंद मला वाटतो. ही सर्वांनी पहावी अशी कथा आहे आणि सुमारे 240 देश-प्रदेशांतील वैश्विक प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचेल म्हणून मी उत्सुक आहे.”


हेही वाचा :प्रसाद ओक आणि प्राजक्ता माळी हॉटसीटवर!

First Published on: July 22, 2022 2:34 PM
Exit mobile version