जॉनी डेपला ११६ कोटी रुपये देण्यास एम्बर हर्ड सक्षम नाही, वकिलाचा खुलासा

जॉनी डेपला ११६ कोटी रुपये देण्यास एम्बर हर्ड सक्षम नाही, वकिलाचा खुलासा

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप (Hollywood Actor Johnny Depp) सध्या प्रचंड चर्चेत आहे. मानहानीच्या खटल्यामध्ये तो जिंकला असून त्याला १५ मिलिअन डॉलर म्हणजेच ११६ कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने एम्बर हर्डला (Amber Heard) दिले आहेत. मात्र, त्याची पूर्वाश्रमीची बायको एम्बर हर्ड (Ex Wife Amber Heard) एवढे पैसे देण्यास सक्षम नसल्याचं तिच्या वकिलांनी सांगितलं आहे.

सहा आठवड्यांपासून चाललेल्या या प्रकरणाची जगभर जोरदार चर्चा झाली. अखेर हा खटला जॉनी डेपने जिंकल्याने त्याच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला. मात्र, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एम्बर हर्ड एवढे पैसे भरू शकत नसल्याचं तिच्या वकिलांनी म्हटलं आहे. त्यामुळे या निकालावर ती पुन्हा वरच्या न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

एम्बर हर्डची एकूण संपत्ती फक्त ८ मिलिअन डॉलर म्हणजेच ६२ कोटी आहे. त्यामुळे ती ११६ कोटी रुपये भरण्यास सक्षम नसल्याचे अनेक मीडिया रिपॉर्ट्समधून सिद्ध होत आहे.

हे ही वाचा जॉनी डेप आणि एम्बर हर्ड खाटल्यावर अखेर पूर्णविराम, पण एलॉन मस्क यांचं ट्विट चर्चेत

जॉनी डेपपासून घटस्फोट (Divorce) घेतल्यानंतर तिला पोटगी म्हणून ७ मिलिअन डॉलर मिळाले होते. हे पैसे ती दान (Donate) करणार होती. मात्र, अद्यापही तिने हे पैसे दान केले नसल्याचे सुनावणी दरम्यान समोर आले. तसेच, तिने २०१३ ते २०१९ या काळात १० मिलिअन डॉलर्स कमावले. तर, तिच्याकडे ८ मिलिअन डॉलर्स किंमतीचे घर असून अनेक गाड्या आहेत.

हे नेमकं प्रकरण काय?

जॉनी आणि एम्बर या दोघांनी २०१५ मध्ये लग्न केलं होतं आणि लग्नाच्या एका वर्षानंतर म्हणजेच २०१६ मध्ये एम्बर जॉनीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता आणि त्यानंतर २०१७ मध्ये जॉनी आणि एम्बर यांचा घटस्फोट झाला होता.

एम्बरने २०१८ मध्ये वॉशिंग्टन पोस्टमध्ये एक ओपिनियन पोस्ट लिहिली होती. म्हणजेच एक लेख लिहिला होता. त्यात तिने जॉनीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर जॉनीने अंबरवर मानहानीचा खटला सुद्धा दाखल केला होता. त्यानंतर कोर्टात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान एम्बरने अभिनेता जॉनी डेपवर अनेक आरोप सुद्धा केले जे अत्यंत धक्कादायक होते. बळजबरीने लैंगिक अत्याचार आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप सुद्धा तिने जॉनीवर केला होता. आणि त्या नंतर जॉनीने तिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.

First Published on: June 4, 2022 4:28 PM
Exit mobile version