Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन जॉनी डेप आणि एम्बर हर्ड खाटल्यावर अखेर पूर्णविराम, पण एलॉन मस्क यांचं...

जॉनी डेप आणि एम्बर हर्ड खाटल्यावर अखेर पूर्णविराम, पण एलॉन मस्क यांचं ट्विट चर्चेत

Subscribe

अभिनेता जॉनी डेपhollywood actor johnny depp आणि त्याची आधीची पत्नी एम्बर हर्डAmber Heard यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद सुद्धा झाला होता. यासंदर्भातच न्यायालयात साक्षीदार हजर झाले काही तास चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर न्यायाधिशांनी अभिनेता जॉनी डेपच्या बाजूने निकाल दिला.

हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी डेप (hollywood actor johnny depp) आणि त्याची आधीची पत्नी एम्बर हर्ड (Amber Heard) या दोघांमध्ये मागच्या सहा आठवड्यांपासून मानहानीचा खटला सुरु होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद सुद्धा झाला होता. यासंदर्भातच न्यायालयात साक्षीदार हजर झाले काही तास चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर न्यायाधिशांनी अभिनेता जॉनी डेपच्या बाजूने निकाल दिला. नेमकं हे प्रकरण काय आहे, पण आता या खटल्यामध्ये एक नवीन ट्विस्ट आला आहे. टेस्लाचे ( tesla) मालक एलॉन मस्क यांनी या वावर ट्विट केले आहे. त्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगते आहे. यावर एवढा मोठा वादंग मागच्या काही दोवासांपासून का सुरु होता हे जाणून घेऊ.

नेमकं हे प्रकरण काय आहे ?

- Advertisement -

जॉनी डेप (hollywood actor johnny depp) आणि त्याची आधीची पत्नी एम्बर हर्ड (Amber Heard) यांच्यात जो खटला सुरु होता त्यामुळे हे दोघेही चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. यांच्यात सुरु असलेल्या मानहानीचा खटल्यात न्यायालयाने निकाल दिला आहे. जॉनी डेप याने हा खटला जिंकला आहे. जॉनी डेपला आता १५ दशलक्ष डॉलर्स म्हणेजच १.५ अब्ज रूपयांची नुकसान भरपाई सुद्धा मिळणार आहे. या खटल्यादरम्यान एम्बरने आपली बदनामी केली हे न्यायालयात सिद्ध करण्यात जॉनी सक्षम आहे असं ज्युरींनी सांगितलं होतं. त्याचबरोबर काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने जॉनीला सुद्धा दोषी ठरवले होते. म्हणून जॉनीला अंबरला २ दशलक्ष डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागेल असंही सांगण्यात आलं होतं.

एम्बरने २०१८ मध्ये वॉशिंग्टन पोस्ट मध्ये एक पोस्ट एक ओपिनियन पोस्ट लिहिली होती म्हणजेच एक लेख लिहिला होता. त्यात तिने जॉनीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर जॉनीने अंबरवर मानहानीचा खटला सुद्धा दाखल केला होता. त्यानंतर कोर्टात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान एम्बरने अभिनेता जॉनी डेपवर अनेक आरोप सुद्धा केले जे अत्यंत धक्कादायक होते. बळजबरीने लैंगिक अत्याचार आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप सुद्धा तिने जॉनीवर केला होता.

- Advertisement -

एम्बरलाही भरपाई मिळणार-

या खटल्यादरम्यान ज्युरीने एम्बरसोबत जॉनीला सुद्धा अनेक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले आहे. त्यामुळे एम्बरला २ दशलक्ष डॉलर्सची नुकसान भरपाई देण्यात येईल असं न्यायालयाने संगितलं. या खटल्यादरम्यान एकूण सात न्यायाधीशांचे खंडपीठ होते. आणि या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने जॉनी डेपच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे त्याच्या वकिलांचंही गोंधळ उडाला. यावेळी सगळेच भावुक झाले होते पण सर्वांनीच एकमेकांना मिठी मारत शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे जॉनी डेपचे चाहते सुद्धा या निर्णयाने आनंदित झाले होते. जॉनीने त्याची पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर विरुद्ध मानहानीचा खटला जिंकल्यानंतर अभिनेता जॉनीने (hollywood actor johnny depp) सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट सुद्धा शेअर केली. या भल्यामोठ्या पोस्टमध्ये जॉनीने लिहिलंय की, ज्युरींनी त्याला त्याच आयुष्यचं परत दिलंय. दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयावर एम्बर सुद्धा एक पोस्ट लिहून ती शेअर केली आहे. त्यात ती लिहिते कि या निर्णयामुळे मला खूप निराश वाटत आहे. घरगुती हिंचाराविरोधात आवाज उठविणाऱ्या इतर महिलांनाही या निर्णयाचा नक्कीच धक्का बसणार आहे.

२०१७ मध्ये जॉनी आणि एम्बर यांचा झाला होता घटस्फोट-

जॉनी आणि एम्बर या दोघांनी २०१५ मध्ये लग्न केलं होतं आणि लग्नाच्या एका वर्षानंतर म्हणजेच २०१६ मध्ये एम्बर जॉनीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता आणि त्यानंतर २०१७ मध्ये जॉनी आणि एम्बर यांचा घटस्फोट झाला होता.

या सगळ्यात कायदेशीर कारवाई केव्हा सुरु झाली ?

२०१८ मध्ये एम्बरने वॉशिंग्टन पोस्ट (washington post) मध्ये स्वतः लिहिलेला एक लेख प्रकाशित केला होता. या लेखाच्या माध्यमातून एम्बरने स्वतःचं मत मांडलं होतं. आणि हा लेख प्रकाशित झाल्यावर एकूणच या सगळ्या वादाला तोंड फुटले. त्या लेखात एम्बरने त्यावेळी माझ्यावर घरगुती हिंसाचार होतो आहे असा उल्लेख केला होता. आणि त्या नंतर जॉनीने तिच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता.

या खटल्या दरम्यान काय आहे एलॉन मक्स यांचं ट्विट –

जॉनी आणि एम्बर यांच्या वादाच्या खटल्यात टेस्लाचे (tesla) मालक एलॉन मक्स (elon musk) यांनी सुद्धा यांनी सुद्धा एका ट्विट केलंय, त्या ट्विटवरही सध्या चर्चा सुरु आहेत. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान जॉनीने एम्बर आणि एलॉन मस्क यांचं अफेअर असल्याचा आरोप सुद्धा एम्बरवर केला होता. पण जॉनी सोबतच मी पहिल्यांदा एलॉनला एका कार्यक्रमामध्ये भेटले होते असं एम्बरने स्पष्ट केले. यानंतर एलॉन मस्कelon musk यांनी आपल्या ट्विटमध्ये जॉनी आणि एम्बररा यांच्या साठी ट्विट करत म्हटलं की, मला अशा आहे की ते दोघेही पुढे उत्तम वाटचाल करतील ते दोघंही सर्वोत्तम आणि अविश्वसनीय आहेत. असं ट्विट एलॉन मस्क यांनी करत जॉनी आणि एम्बर यांच्या विविदित खाटल्यावर भाष्य केलं आहे.

जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्या या हायप्रोफाईल खटल्यावर अखेर अनेक वर्षांनी निर्णय देण्यात आला. एका लेखापासून सुरू झालेला हा वादग्रस्त खटला अखेर आता संपुष्टात आला आहे. यामध्ये जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्यासह टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांचं नावं आणि ट्विटसुद्धा समोर आलं आहे. जॉनी डेप (hollywood actor johnny depp) आणि एम्बर हर्डरा यांच्या या खटल्यांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती, अखेर त्याचा निकाल लागल्यानं आता ती चर्चाच संपुष्टात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -