अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदानाच्या ‘गुडबाय’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदानाच्या ‘गुडबाय’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत आहे. सध्या रश्मिका तिच्या ‘गुडबाय’ चित्रपटामुळे चर्चेत असून रश्मिकाचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट असणार आहे. महानायक अमिताभ बच्चन देखील या चित्रपटाचा भाग असणार आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाचा पोस्टर रिलीज केला आहे.
गुड बायच्या या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन आणि रश्मिका पतंग उडवताना दिसत आहे.

अशी आहे चित्रपटाची गोष्ट
या चित्रपटाचे दिग्दर्शन विकास बहलने केलं असून ‘गुडबाय’ची गोष्ट एका कुटुंबावर आणि नात्यांवर आधारित असणार आहे. तसेच या कौटुंबिक चित्रपटामध्ये अनेक गमतीदार किस्से, भावनिक क्षण देखील पाहायला मिळतील. तसेच या चित्रपटात रश्मिका मंदानासोबत अमिताभ बच्चन देखील मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच या दोघांव्यतिरिक्त नीना गुप्ता, पावेल गुलाटी, एली अवराम, सुनील ग्रोवर आणि साहिल मेहता सुद्धा महत्वाच्या भूमिकेत असतील.

अमिताभ यांनी शेअर केला पोस्टर


हेही वाचा : ‘ब्रह्मास्त्र’ बॉलिवूडमधील सर्वाधिक महागडा चित्रपट; 9 सप्टेंबर रोजी 8000 स्क्रिन्स वर होणार प्रदर्शित

First Published on: September 4, 2022 10:29 AM
Exit mobile version