Amitabh Bachchan Birthday : पहिल्या चित्रपटासाठी बिग बींना मिळाले केवळ ‘इतके’ मानधन

Amitabh Bachchan Birthday : पहिल्या चित्रपटासाठी बिग बींना मिळाले केवळ ‘इतके’ मानधन

बॉलिवूड सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन आज त्यांचा 81 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बींच्या वाढदिवसानिमित्त अनेक बॉलिवूड कलाकार आणि बिग बींचे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे चाहते देशातच नाही परदेशातही आहेत. आपल्या अनेक सुपरहिट सिनेमांनी त्यांनी आपल्या करिअरला चार चाँद लावले. अमिताभ बच्चन यांना शहेनशहा, अँग्री यंग मॅम, बिग बी अशा अनेक नावांनी ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना ओळखले जाते.

गेल्या 5 दशकांपासून ते चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. 7 नोव्हेंबर 1969 मध्ये त्यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्तानी’ प्रदर्शित झाला होता. 1969 साली सुरू झालेला त्यांचा प्रवास आजही यशस्वीरित्या सुरू आहे.

‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटातून अमिताभ यांनी केलं पदार्पण

लाखो-करोडोचे मालक असणारे अमिताभ बच्चन एकेकाळी चित्रपटसृष्टीत भाग बनण्यासाठी खूप कष्ट करत होते. एका कंपनीत नोकरी करत होते. पण एकेदिवशी त्यांना एका चित्रपटात काम मिळाले.

अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्तानी’ हा आहे. या चित्रपटाचे लेखन, निर्मिती, दिग्दर्शन ख्वाजा अहमद अब्बास यांनी केले होते. या चित्रपटात उत्पल दत्त, मधु, एके हंगल यांसह अमिताभ बच्चन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. तसेच टीनू आनंद कवीच्या भूमिकेत होते आणि अमिताभ बच्चन टीनू आनंद यांच्या मित्राच्या भूमिकेत होते.
कवीची भूमिका या चित्रपटात खूप महत्त्वाची होती. पण काही कारणामुळे टीनू आनंद यांना हा चित्रपट सोडून द्यावा लागला. त्यानंतर अमिताभ बच्चन यांना कवीची मुख्य भूमिका मिळाली आणि अशा प्रकारे अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटला सुरुवात झाली.

पहिल्या चित्रपटासाठी 5 हजार रुपये मिळाले मानधन

अमिताभ बच्चन यांना त्यावेळेस या भूमिकेसाठी 5 हजार रुपये दिले गेले होते. परंतु बच्चन यांना यापेक्षा जास्त पैसे हवे होते. तरीदेखील त्यांनी 5 हजार रुपये घेऊन चित्रपट केला. या चित्रपटाने खास अशी कमाल केली नाही, परंतु या चित्रपटानंतर अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले.


हेही वाचा : “कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही!” ब्लू टिक काढल्याने तेजस्विनी पंडित संतापली

First Published on: October 11, 2023 10:59 AM
Exit mobile version