घरमनोरंजन"कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही!" ब्लू टिक काढल्याने तेजस्विनी पंडित संतापली

“कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही!” ब्लू टिक काढल्याने तेजस्विनी पंडित संतापली

Subscribe

भिनेत्री तेजस्विनी पंडित हिने राज ठाकरे यांच्या टोल संदर्भातील भूमिकेला पाठिंबा देत राज्य सरकारवर सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल संदर्भात केलेल्या विधानावर निशाणा साधला. ज्यानंतर आता तिच्या X या सोशल मीडिया साइटवरील व्हेरिफिकेशन टिक म्हणजेच ब्लू टिक काढून टाकले असल्याचे समजते.

मुंबई : मनसे नेते अविनाश जाधव टोलदरवाढीच्या मुद्द्यावरून उपोषणाला बसले होते. ज्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. पुढील दोन दिवसांत लहान वाहनांवरील म्हणजेच कार व इतर कमर्शियल वाहनांवरील टोल आकारणी बंद केली नाही तर टोल नाके जाळून टाकू, असा इशारा राज ठाकरे राज्य सरकारला दिला आहे. काल (ता. 09 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी टोलच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका जाहीर केली. यानंतर अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा देत राज्य सरकारवर सरकारवर आणि विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल संदर्भात केलेल्या विधानावर निशाणा साधला. ज्यानंतर आता तिच्या X या सोशल मीडिया साइटवरील व्हेरिफिकेशन टिक म्हणजेच ब्लू टिक काढून टाकले असल्याचे समजते. (Tejaswini Pandit was angered by the removal of the blue tick on the social media site X)

हेही वाचा – अजित पवार गटाचा मोठा निर्णय; शरद पवार जिथे सभा घेतील तिथे अजित पवार …

- Advertisement -

तेजस्विनी पंडित हिचे ब्लू टिक काढून टाकण्यात आल्यानंतर तिने ‘कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही’ अशा मथळ्याखाली एक पोस्ट लिहिली आहे. तिने काल जनतेची इतकी वर्ष फसवणूक केली, असा प्रश्न उपस्थित केला. तिने व्यक्त केलेले मत हे काही लोकांना स्पष्ट न झाल्याने राजकीय दबाव टाकून व्हेरिफिकेशन काढले गेले असल्याचा आरोप तेजस्विनीने केला आहे. यासंदर्भात एक पोस्ट X वर शेअर करत तिने लिहिले आहे की, “कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहात नाही! माझ्या X (ट्विटर) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची’ इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून?”

तसेच, तिने पुढे लिहिले आहे की, “X (ट्विटर) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. पण या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही. सामान्यांचा आवाज बंद करणे हाच यांचा बहुदा एकमात्र ‘X’ फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र’साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत! जेव्हा जेव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदुमणारच आहे. जय हिंद जय महाराष्ट्र!”

- Advertisement -

काय होती तेजस्विनीची पोस्ट?

देवेंद्र फडणवीसांना खासगी वाहनांकडून टोलवसुली केली जात नसल्याचे वक्तव्य करताच अभिनेत्री तेजस्वी पंडितने फडणवीसांचा हा व्हिडिओ X या सोशल मीडिया साइटवर पोस्ट करत फडणवीसांच्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले. तेजस्वी पंडितने म्हटले आहे की, “म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ?? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !! How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”
Unbelievable!! SHARE IF YOU FEEL CHEATED TOO !!! #सगळेहुकलेत #अवघडआहेबुवा #महाराष्ट्रजागाहो”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -