‘हा’ आहे बिग बींचा आहार!

‘हा’ आहे बिग बींचा आहार!

amitabh bachchan

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व गोष्टींची काळजी घेतलेली असतानाही त्यांना कोरोनाची लागण झाली. बीग बी हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेत आहेत. अमिताभ बच्चन यांचे वय, आरोग्य आणि जुने आजार लक्षात घेता त्यांच्या डाएटची विशेष काळजी घेतली जात आहे.

कोव्हड-१९ची मेडिकल टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर अमिताभ बच्चन यांना मुंबईतील नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि या आराध्याही करोना पॉझिटिव्ह आली आहे. अभिषेकवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर ऐश्वर्या आणि आराध्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्यानं त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

बिग बींचे डाएट

आरोग्य तज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, बीग बींचे डाएट प्लॅन करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना पचण्यास हलका आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारा आहार असावा. सोबत रुग्णाच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्सची कमतरता होणार नाही, याचीही पूर्ण काळजी घेतली जात आहे. विशेषतः ‘व्हिटॅमिन सी’ आणि ‘व्हिटॅमिन डी’चा शरीराला पुरवठा होणे गरजेचं आहे. सोबतच गरम पाणी, ताज्या भाज्या, खिचडी आणि हलक्या डाळी डाएटमध्ये असाव्यात. यामुळे रुग्णाच्या शरीराला ऊर्जा मिळण्यास, थकवा दूर होण्यास, पांढऱ्या रक्तपेशींची संख्या

बिग बी आजार लपवत नाहीत

अमिताभ बच्चन यांनी कधीच आपला कोणताच आजार लपवला नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचीही माहिती त्यांनी स्वतःहून ट्विटरद्वारे दिली. अमिताभ बच्चन यांना ‘कुली’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मोठा अपघात झाला होता. या घटनेत त्यांच्या आतड्यांना गंभीर दुखापत झाली होती. यावेळी त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. यानंतर टीबी, हेपेटायटिस यासारख्या आजारांनी त्यांना ग्रासलं होतं. पण बिग बींनी या आजारांची माहिती कधीही लपवली नाही. उलट या आजारांचा सामना करून त्यांनी सर्वसामान्यांमध्येही जगजागृती करण्याचे कार्य केले.


हे ही वाचा – मुंबईत कोरोनामुक्तांची वाढ!


First Published on: July 14, 2020 10:02 AM
Exit mobile version