घरCORONA UPDATEमुंबईत कोरोनामुक्तांची वाढ!

मुंबईत कोरोनामुक्तांची वाढ!

Subscribe

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी रूग्णांच बरं होण्याचं प्रमाणही जास्त आहे. आत्तापर्यंत राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दीड लाखाच्या जवळ पोहचली आहे. एकीकडे राज्यात मुंबईत सर्वाधिक रूग्ण संख्या असताना रूग्ण बरे होण्यातही मुंबई आघाडीवर आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्क्यांवर पोहचलं आहे. अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रविवारपर्यंत एकूण १ लाख ४० हजार ३२५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. १ लाख ४० हजार ३२५ रूग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. १ लाख ३ हजार ५१६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. रूग्ण बरे होण्याच्या संख्येत मुंबई आघाडीवर आहे. मुंबई बाधित रुग्णांची  संख्या ९२ हजार ९८८ होती, त्यांतील ६४ हजार ८७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर २२ हजार ५०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्य़ात बाधित रुग्णांची  ६१ हजार ८६९, बरे झालेले रुग्ण २६ हजार ४८९ आणि प्रत्यक्ष उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ३३ हजार ७३३ आहे.

- Advertisement -

पुण्यातही कहर सुरूच

मुंबईसह पुणे जिल्ह्य़ात कोरोनाचा कहर झाला आहे. रविवार्पयच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्य़ात बाधित रुग्णांची संख्या ३९ हजार १२५ होती, त्यातील १६ हजार ४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.  सध्या २१ हजार ६०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील इतर जिल्ह्य़ांतही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगण्यात आले.


हे ही वाचा – क्यूआर कोड पास असेल, तरच लोकल प्रवासाला परवानगी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -