अमिताभ बच्चन यांच्या ‘ऊंचाई’ चित्रपटाने 3 दिवसात केला 8 कोटींचा टप्पा पार

अमिताभ बच्चन यांच्या ‘ऊंचाई’ चित्रपटाने 3 दिवसात केला 8 कोटींचा टप्पा पार

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऊंचाई’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा, बोमन ईरानी, अनुपम खेर आणि डॅनी डेन्जोंगपा हे मुख्य भूमिकेत आहेत. तसेच अभिनेत्री नीना गुप्ता देखील या चित्रपटात महत्वाची साकारताना दिसतील. 11 नोव्हेंबर रोजी हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन अवघे तीन दिवस झाले. परंतु तीनच दिवसात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे.

‘ऊंचाई’ चित्रपटाने कमावले 3 दिवसात इतके कोटी

परिणीती चोप्राने साकारणारली गाईडची भूमिका
अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन ईरानी यांच्या ‘ऊंचाई’ चित्रपटामध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा गाईडची भूमिका साकारताना दिसून येईल. चित्रपटामध्ये परिणीती ट्रेकिंग गाईड आहे. जी लोकांना ट्रेकिंगमध्ये येणाऱ्या संकटांबद्दल सांगते. या चित्रपटामध्ये परिणीती अमिताभ बच्चन यांच्या मित्रांना माउंट एवरेस्टवर चढण्यासाठी मदत करते.

 


हेही वाचा :

सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांना ब्रेक देणाऱ्या बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मृत्यू

First Published on: November 14, 2022 10:05 AM
Exit mobile version