…म्हणून सोनम म्हणते ‘परफेक्ट’ आहे माझा नवरा!

…म्हणून सोनम म्हणते ‘परफेक्ट’ आहे माझा नवरा!

मागील वर्षात लग्नबंधनात अडकलेले आनंद आहूजा आणि सोनम कपूर आपले वैवाहिक आयुष्य मस्त मजेत घालवताना दिसत आहे. दोघांमध्ये असणारं नातं हे किती घट्ट आहे हे विशेष सांगण्याची आवश्यकता नाही. ते नेहमी त्यांच्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून नकळत समजून येतेच. तसेच आनंद सोनमची किती काळजी घेतो, हे देखील सगळ्या चाहत्यांना माहीत आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर दोघांचे काही फोटो व्हायरल होतांना दिसत आहे. हा फोटो पाहताना प्रत्येक मुलीला आपला पती देखील असा काळजी घेणारा असावा, असे वाटल्या शिवाय राहणार नाही.

चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय

दिल्लीच्या एका शू स्टोरच्या लॉन्चिंगच्या कार्यक्रमास सोनम आणि आनंद पोहचले होते. व्हायरल होणारा फोटो या दरम्यानचा आहे. यावेळी सोनमने एका शूजची जोडी ट्राय करून पाहिली. सोनमने बुट पायात घातले आणि आनंदने गुडघ्यावर बसत तिच्या शूजची लेस बांधली. हाच लेस बांधतानाचा आनंद सोनमचा फोटो त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय होत आहे.

फोटोवर चाहते फिदा

मागेच महेंद्र सिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षीचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यात सॅन्डलचा बेल्ट लावताना धोनी दिसत होता. या धोनी आणि साक्षीच्या फोटोवर चाहत्यांनी खूप प्रेम दिले. तसेच सोनम आणि आनंदच्या फोटोवर चाहते फिदा होतांना दिसणार आहे.

आनंद आहुजाने ही बदलले नाव

लग्न ठरल्यापासून ते पार पडेपर्यंत सोनमने आपल्या चाहत्यांसह आंनदाचे सगळे क्षण शेअर केले होते. सोनम सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असल्याने सोनमने सोशल मीडियावर तिचे नाव बदलून ‘सोनम कपूर आहुजा’ असे केले आहे. मात्र तिने नाव बदलल्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल ही केले होते. विशेष म्हणजे नावातील हा बदल केवळ सोनमनेच केला नसून आनंदने देखील केला आहे. आनंदने त्याच्या नावापुढे सोनमचं नाव जोडले आहे. मात्र आनंदने हा बदल का केला हे नुकतेच सोनमने सांगितले आहे.

First Published on: April 22, 2019 10:46 AM
Exit mobile version