बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर लवकरच एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन येत आहे. या आगामी चित्रपटाचं नावं AK vs AK असं असून चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप याने केलं आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या निमित्ताने अनिल कपूर या अभिनेत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांसह चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चाहत्यांना असे सांगितले की, #AkVsAk या हॅशटॅगचा वापर करून तुम्ही मला प्रश्न विचारू शकातात, मी त्या प्रश्नांना मोकळेपणाने उत्तरं देईल. मात्र यावेळी अनिल कपूर यांच्या एका उत्तरानं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कारण ही तसंच आहे. कारण अनिल कपूर यांना एका चाहतीने गुजरातीमधून विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी थेट मराठी भाषेतून उत्तर देऊन साऱ्याचं लक्ष वेधून घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, युट्यूबर असणाऱ्या अदिती रावल या तरुणीने अनिल कपूर यांच्या AK vs AK या चित्रपटाचं कौतुक केलं. यामध्ये अनिल कपूर यांनी खूपच छान अभिनय केला आहे. पडद्यावर वावरताना ते अभिनय करत आहेत असं वाटतं नाही, अशा शब्दांमध्ये अदितीने गुजराती आणि इंग्रजी भाषेत अनिल कपूर यांचं कौतुक केलं. तसेच आपल्या या ५८ सेकंदांच्या व्हिडिओच्या शेवटी तिने अनिल कपूर यांना मला तुम्हाला भेटून तुमची मुलाखत घेण्याची इच्छा आहे असंही म्हटलं. हा व्हिडिओ ट्विट करताना अदितीने तुम्ही एवढी ऊर्जा कुठून आणता असा प्रश्न अनिल कपूर यांना #AkVsAk हा हॅशटॅग वापरुन विचारला.
बघा व्हिडिओ
I would like to meet @AnilKapoor someday and ask only one question that “how do you manage to get so much energy and invest the same in to your every frame”?♥️👏🏼👌🏼 #AkVsAk is a must watch film on @NetflixIndia 👌🏼 #AditiKaReview pic.twitter.com/Bf2srkl1yD
— Aditi Raval (@aditiraval) December 30, 2020
या तरूण चाहती आदितीच्या गुजराती प्रश्नावर उत्तर देताना मुंबईकर असणाऱ्या अनिल कपूर यांनी मराठीमधून उत्तर दिले. “तुम्ही मला बोलवा मी कधीही येईन” असे उत्तर अनिल कपूर यांनी या ट्विटला दिले आहे.
Tumhi mala bolva , mi kadhi he yahen @aditiraval 👍 https://t.co/SkpEpWAi5n
— Anil Kapoor (@AnilKapoor) December 30, 2020
मात्र, अनिल कपूर यांनी या चाहतीने विचारलेल्या प्रश्नाला अस्सल मराठी भाषेतूनच का उत्तर दिले, यासंदर्भात सोशल मीडियावर सध्या चर्चेला उधाल आल्याचे पाहायला मिळतेय.